शासनाच्या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात लढ्यासाठी सच्चा शिक्षकाची गरज

satana
satana

सटाणा : राज्य शासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे शिक्षक व शिक्षणसंस्थांचे प्रश्न अधिकच जटील बनले आहे. शाळांचे कंपनीकरण, पेन्शन, विनाअनुदान, अतिरिक्त शिक्षक, दुर्गम शाळा व रात्र शाळा बंद करणे या सर्व घटनाक्रमामुळे सरकारचे शिक्षणविरोधी धोरण स्पष्ट झाले आहे. या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात लढा उभारण्यासाठी सच्च्या शिक्षकाची गरज आहे. असे प्रतिपादन शिक्षक भारतीपुरस्कृत महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) चे अधिकृत उमेदवार संदीप बेडसे यांनी आज शुक्रवारी (ता.१३) येथे केले. 

नाशिक विभाग शिक्षक मतदार निवडणूक २०१८ च्या निवडणुकीसाठी टीडीएफचे अधिकृत उमेदवार संदीप बेडसे यांनी गेल्या चार दिवसांपासून बागलाण तालुका दौरा सुरु केला आहे. त्यानिमित्त आज येथील व्ही.पी.एन. विद्यालयात आयोजित शिक्षक मेळाव्यात बेडसे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष कैलास देवरे, टी.डी.एफ.चे जिल्हाध्यक्ष गोरख सोनवणे, मुख्यध्यापक अनिल जाधव, बी. एस. देवरे, एस. बी. मराठे, सुभाष सोनवणे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष के.के. आहिरे, एन.डी.एस.टी चे कार्यवाहक साहेबराव कुटे, रविन्द्र मोरे, सूर्यभान सादडे, किशोर जाधव, सुनील भामरे आदी उपस्थित होते. 

बेडसे म्हणाले, सत्तेत आल्यापासून राज्यातील भाजप सरकारने शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ केला आहे. एकाच शिक्षकदालनात बसणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी शिक्षकांच्या हक्कांसाठी व सन्मानासाठी शिक्षकच आमदार निवडून द्या. लोकशाही समाजवाद, राष्ट्रभक्ती, नियोजन, विज्ञाननिष्ठा व धर्मनिरपेक्षता जोपासणाऱ्या शिक्षक भारती व टीडीएफच्या पाठीशी शिक्षक मतदारांनी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही उमेदवार श्री. बेडसे यांनी केले. खर्डे (ता.देवळा) कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास देवरे, अनिल जाधव, के.के.अहिरे आदींची भाषणे झाली.

मेळाव्यास पंचायत समितीचे माजी सभापती रामकृष्ण अहिरे, बागलाण तालुका क्रीडा अध्यापक संघाचे अध्यक्ष विनायक बच्छाव, मुख्याध्यापक प्रवीण खैरनार, बाजीराव सूर्यवंशी, दिलीप मेतकर, पी.टी.गुंजाळ, आर.पी. गुंजाळ, दीपक ठाकरे, दिलीप रणधीर, श्रीमती नांद्रे, जे. आर. पाटील, पुष्पलता पाटील, भारती पाटील, रंजना सोनवणे, जयश्री अहिरे, वैशाली कापडणीस, क्रीडाशिक्षक सी.डी.सोनवणे, आर. डी. खैरनार, शेखर दळवी, व्ही.बी. शेवाळे, संगीता भामरे, वाय.एस.भदाणे, एस.पी.जाधव, आर.टी.सोनवणे, मुख्याध्यापक पी.डी पाटील, बी.जे पवार, रमाकांत भामरे, सचिन शेवाळे, सतीश भामरे, संजय सोनवणे, ए. बी. खरे, जे. एम. जाधव, जे. आर. वाघ, एस. जे. पाटील, बी. ए. निकम, वीरेश महाले, अमोद पगार, विशाल अहिरे, संदीप पवार, विकास सोनवणे, विनोद सोनवणे, आर.के.चव्हाण, आर.पी.देवरे आदींसह शिक्षक व शिक्षिका मतदार बहुसंख्येने उपस्थित होत्या. उपमुख्याध्यापक ए.आर.जाधव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन करून आभार मानले. 

दरम्यान, उमेदवार संदीप बेडसे यांनी सर्व शिक्षक नेत्यांसह तालुक्यातील लोकनेते पं.ध.पाटील मराठा हायस्कूल, जिजामाता गर्ल्स हायस्कूल तसेच ताहाराबाद, सोमपूर, नामपूर, करंजाड, अंतापूर, मुल्हेर, आसखेडा, पिंपळकोठे, जायखेडा, कंधाणे, वीरगाव, वटार, जोरण, कपालेश्वर, तळवाडे दिगर, आराई, ब्राह्मणगाव, लखमापूर, वायगाव, अजमेर सौंदाणे, देवळाणे आदी गावांच्या शाळांमधील शिक्षक मतदारांच्या भेटी घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com