नेदरलँडमध्ये स्पर्धेसाठी 'बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूल'ची निवड

रोशन खैरनार
मंगळवार, 10 जुलै 2018

सटाणा - येथील बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूलच्या हॉकी संघाची नेदरलँड या देशाच्या 'वन मिलिअन हॉकी लीग' स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातून निवड झाली आहे. जिल्ह्यातील इतर ११ शाळांच्या संघांबरोबर बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूलने हा बहुमान मिळविला आहे.

सटाणा - येथील बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूलच्या हॉकी संघाची नेदरलँड या देशाच्या 'वन मिलिअन हॉकी लीग' स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातून निवड झाली आहे. जिल्ह्यातील इतर ११ शाळांच्या संघांबरोबर बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूलने हा बहुमान मिळविला आहे.

भारतातील माध्यमिक विद्यालयांमध्ये हॉकी या खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी नेदरलँड या देशाने 'वन मिलिअन हॉकी लीग' स्पर्धेचा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार भारतातील प्रमुख शहरे व गावांमधील शाळांच्या हॉकी संघांची या स्पर्धेसाठी निवड केली जात आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या येथील बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूलच्या हॉकी संघाचीही या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. शाळेच्या हॉकी संघातील खेळाडू व क्रीडा शिक्षकास प्रशिक्षण देण्यासाठी नेदरलँडचे आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू निकोलस डेन ओडेन व जोएन वाँन रीडेन हे शाळेत आले आहेत. त्यांनी काल सोमवार (ता.९) रोजी दिवसभर विद्यार्थ्यांना हॉकीचे प्रशिक्षण दिले. आंतरराष्ट्रीय हॉकी खेळातील नियम व बारकावे त्यांनी विद्यार्थी खेळाडूंना समजावून सांगितले. त्यांच्या समवेत महाराष्ट्र हॉकी फेडरेशनचे सचिव अजीज सैय्यद व प्रकल्प संचालिका सुप्रिया गांगुर्डे हे देखील उपस्थित होते. यावेळी फेडरेशनकडून शाळेस ५० हॉकी स्टिक्स व बॉल भेट देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे यांनी नेदरलँडच्या प्रशिक्षकांचे स्वागत केले. शाळेचे हॉकी प्रशिक्षक साजिद मन्सुरी यांचाही पाहुण्या प्रशिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जे. के. सोनवणे, संचालक राजेंद्र भांगडिया, शाळा विकास अधिकारी नानासाहेब सोनवणे, मुख्याध्यापक संजय निकम, उपमुख्याध्यापिका जयश्री गुंजाळ, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Web Title: In the Netherlands, the 'Best English Middle School' is selected for the tournament