नवा विकास आराखडा दहा दिवसांत - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नाशिक - शहराचा नवीन विकास आराखडा दहा दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. त्याचबरोबर नाशिकच्या बांधकाम क्षेत्रापुढील विविध प्रलंबित अडथळ्यांवरही योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. क्रेडाई नाशिक, तसेच बांधकाम क्षेत्राशी निगडित विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आज सायंकाळी सिन्नर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या विषयाकडे लक्ष वेधले. 

नाशिकचा प्रस्तावित विकास आराखडा लवकरच जाहीर होणार असून, या आराखड्यातील डी.सी.पी.आर. बाबत (Development Control and Promotion Regulations) नगररचनेशी संबंधित विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या नाशिककरांच्या काही अपेक्षा आहेत. सुमारे पंचवीस वर्षांतील शहराचा विकास या आराखड्यानुसार होणार आहे. मात्र, नाशिकमध्ये विविध तांत्रिक कारणांमुळे दीड वर्षांपासून बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. याबाबत राज्य सरकारनेच तोडगा काढावा यासाठी क्रेडाई नाशिक सातत्याने पाठपुरावा करत आहे, असे क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी सांगितले. बांधकाम क्षेत्रापुढे सध्या असलेले विविध प्रश्‍न कसे हाताळावेत याबाबत नव्या विकास आराखड्याच्या डी.सी.पी.आर. मध्येच तरतूद झाल्यास कोणतीही संदिग्धता राहणार नाही, असे त्यांना सुचविले. मुख्यमंत्र्यांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेऊन नव्या विकास आराखड्याच्या नियमावलीद्वारे यातून नक्कीच मार्ग काढू, असे आश्‍वासन दिले. 

मुख्यमंत्र्यांची या संदर्भात भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात श्री. कोतवाल यांच्यासह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्‍टचे प्रदीप काळे, आर्किटेक्‍ट ऍड इंजिनिअर्स असोसिएशनचे सचिन गुळवे, आर्किटेक्‍ट अविनाश कोठावदे, आर्किटेक्‍ट रसिक बोथरा, क्रेडाई नाशिकचे सचिव उमेश वानखेडे, उदय घुगे आदींचा समावेश होता. 

Web Title: new development plan for ten days - CM