नववर्ष शुभेच्छांची सोशल मीडियावर धूम

नववर्ष शुभेच्छांची सोशल मीडियावर धूम

तरुणाईचे थर्टीफर्स्टचे नियोजन जोरात; हॉटेलिंग, आउटिंगसह विविध कार्यक्रम

नाशिक - नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईत उत्साहाचे वातावरण आहे. ३१ डिसेंबर, तसेच नववर्षाचा पहिला दिवस १ जानेवारी हे दोन्ही दिवस ब्लॅकआउट असून, या दिवशी एसएमएस पॅक वैध ठरणार नाही, असे सेल्युलर कंपन्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मोबाईल संदेशाद्वारे शुभेच्छा पाठविताना ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत. तरीही व्हॉट्‌सॲप, फेसबुक, हाइकसह अन्य सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर नववर्षाचे विनोदी संदेश येऊन धडकू लागले आहेत. 

थर्टीफर्स्टसाठी काहींनी हॉटेलिंग, आउटिंग, तर काहींनी थेट पार्टीत जाण्याचे नियोजन आखले आहे. कुटुंबीयांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करण्याचेही अनेकांचे नियोजन आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी यंदा विविध संकल्पनांचा विचार केला जात आहे. 

मित्रपरिवारासोबत पार्टीचे नियोजन केले आहे. मित्रमंडळींसोबत रात्री बाहेर जेवायला जाण्यासोबत नाशिकजवळच्या ठिकाणांवर पर्यटनाचा विचार केला जात आहे. आठवड्याच्या शेवटी शनिवारी थर्टीफर्स्ट व रविवारी नववर्षाचा पहिला दिवस असल्याने या दिवशी सुटी असल्याने उत्साहात आणखीच भर पडली आहे. 

त्र्यंबकराजाच्या दर्शनाचे नियोजन
दर वर्षी नववर्षाच्या पहिल्या दिवशी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. यंदादेखील ते त्र्यंबकेश्‍वरला सकाळी दर्शन घेतल्यानंतर शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी रवाना होतील. त्यांच्याप्रमाणेच अनेक व्हीआयपींसह सर्वसामान्यांनीही त्र्यंबकेश्‍वर दर्शनाचे नियोजन केले आहे. याशिवाय सोमेश्‍वर, कपालेश्‍वर, एकमुखी दत्त, नवश्‍या गणपती अशा नावाजलेल्या मंदिरांत नववर्षाच्या दर्शनासाठी जाण्याचे नियोजनही आहे.

डीजे, नाइट्‌स कार्यक्रमांचे बुकिंग 
नववर्ष स्वागताच्या पार्टीसाठी अनेक नामांकित हॉटेल व्यावसायिक, समूहांनी तयारी केली आहे. या वर्षीही सुला विनियार्ड, एक्‍स्प्रेस इन यांसह अन्य काही हॉटेलमध्ये नववर्षाच्या स्वागत समारंभानिमित्त पार्टी होणार आहे. त्याच्या बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे संयोजकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com