नव्या वर्षात डिजिटल सातबाऱ्याची भेट 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

ई-फेरफारअंतर्गत ऑनलाइन फेरफार नोंदीद्वारे अधिकार अभिलेख अद्ययावत करण्यासंदर्भात प्रशिक्षण व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र संथपणे सुरू असलेल्या कामात गती येण्यासाठी गुरुवारी  जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठक घेत येत्या डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवून तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी प्रलंबित ई-फेरफार अर्जावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

नाशिक : भूमिअभिलेखांच्या डिजिटायझेशनअंतर्गत सुरू असलेल्या ई-फेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणीसाठी येत्या डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. वर्षानुवर्षापासून सर्व्हरसह विविध कारणांमुळे रखडलेल्या या अल्टिमेटममुळे नव्या वर्षात डिजिटल सातबारा मिळण्याची आशा आहे. डिजिटायझेशन उपक्रमात ऑनलाइन संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा वितरणावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. त्याअंतर्गत तलाठी व मंडलस्तरावर कामकाज सुरू आहे.

हेही वाचा > सत्तेच्या राजकारणात आ. फरांदेंचे पारडे जड

ई-फेरफारसाठी तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम 

ई-फेरफारअंतर्गत ऑनलाइन फेरफार नोंदीद्वारे अधिकार अभिलेख अद्ययावत करण्यासंदर्भात प्रशिक्षण व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र संथपणे सुरू असलेल्या कामात गती येण्यासाठी गुरुवारी  जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठक घेत येत्या डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवून तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी प्रलंबित ई-फेरफार अर्जावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

क्लिक करा > कॅनडात नोकरी मिळणार म्हणून ते खूश होते..पण

पोच देणे बंधनकारक 
ई-फेरफारअंतर्गत नागरिकांकडून येणाऱ्या अर्जाची पोच देत त्यावर कार्यवाही करून त्वरित ई-फेरफार अद्ययावत करण्याचे निर्देश आहेत. त्यासाठी विशेष मोहीम राबविली जाऊन कामाचा निपटारा करण्याच्या सूचना असल्याने नव्या वर्षात डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा मिळण्याची आशा आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Year's plan to be Digital for documents Nashik Marathi News