शिवसेनेच्या माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर घरफोडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

नाशिक: शिवसेनेच्या माजी महापौरांच्या ओढा शिवारातील फार्म हाऊसच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी एलईटी टीव्हीसह 38 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिक: शिवसेनेच्या माजी महापौरांच्या ओढा शिवारातील फार्म हाऊसच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी एलईटी टीव्हीसह 38 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर विनायक पांडे यांचा ओढा शिवारात असलेल्या रेल्वे पुलाजवळील गट नंबर 227 मध्ये फार्म हाऊस आहे. याच फार्म हाऊसवर रविवारी (ता.7) पहाटेच्या सुमारास घरफोडीचा प्रकार घडला आहे. फार्म हाऊसमधील घराला कुलूप लावलेले असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर संशयितांनी फार्म हाऊसमधील 35 हजार रुपये किमतीचा एलइडी टीव्ही, 1 हजार 500 रुपयांचा टाटा कंपनीचा सेटटॉप बॉक्‍स, 2 हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा डीव्हीडी असा 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. सदरचा प्रकार दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास लक्षात आल्यानंतर पोलीसांना खबर देण्यात आली. ऋतुराज विनायक पांडे (रा. संदर्भ कॉलनी, भुजबळ फॉर्मजवळ, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, उपनिरीक्षक धैर्यशिल घाडगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Web Title: News for theft