"एनआयई' देणार बालमित्रांच्या कलागुणांना वाव...! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

जळगाव - मुलांनी सुटीत कोणतीतरी कला अवगत करून घ्यावी, त्यांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम राहावे, त्यांचे मानसिक स्वास्थ्यही चांगले राहावे, यासाठी पालक प्रत्येक उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना क्‍लासला पाठवतात. पालकांची ही गरज ओळखून "सकाळ माध्यम समूहा'च्या "एनआयई' व्यासपीठातर्फे खास बालमित्रांसाठी 26 ते 30 एप्रिलदरम्यान उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

"सकाळ माध्यम समूहा'च्या "एनआयई' (न्यूजपेपर इन एज्युकेशन) व्यासपीठ व हेमंत क्‍लासेस यांच्यातर्फे बालमित्रांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांना विविध कला शिकता याव्यात, या हेतूने 26 ते 30 एप्रिलदरम्यान भास्कर मार्केटजवळील भारतीय जैन संघटनेच्या सभागृहात उन्हाळी शिबिर होणार आहे. सकाळी आठ ते दुपारी बारा अशी शिबिराची वेळ आहे. शिबिरात सहा ते पंधरा वयोगटातील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या "एनआयई' विद्यार्थी- सभासदांसाठी शंभर रुपये, तर इतर विद्यार्थ्यांसाठी दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. बुधवारी (ता. 26) सकाळी आठला शिबिराचे उद्‌घाटन होणार आहे. 

शिबिरात दीपा देशपांडे, चंद्रकांत भंडारी, सुनील चव्हाण, बापूसाहेब पाटील, ज्योती श्रीवास्तव, किशोर कुलकर्णी आदी विद्यार्थ्यांना विविध कलाप्रकार शिकवणार आहेत. चला तर मग, विचार न करता आजच आपल्या पाल्यांची नावनोंदणी करा. अधिक माहितीसाठी "एनआयई'च्या समन्वयिका हर्षदा नाईक (8623914926) यांच्याशी संपर्क साधावा. 

या कलाप्रकारांचे आयोजन 
शिबिरात बुधवारी (ता. 26) डान्स, विविध खेळ शिकविले जातील. गुरुवारी (ता.27) योगा, खेळ, चित्रकला आणि पेपर क्राफ्ट, इसाप नीतीच्या गोष्टी आणि आपण आदींचा समावेश राहील. शुक्रवारी (ता.28) कॅलीग्राफी, चित्रकला, शनिवारी (ता.29) योग, खेळ, व्यक्तिमत्त्व विकास व नाट्य कार्यशाळा यासह मूल्यशिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. 

विद्यार्थ्यांना "गांधीतीर्थ'ची सफर... 
पहिल्यांदा शाळा आणि नंतर सुटीत उन्हाळी शिबिर यामुळे मुले कंटाळतात. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी शिबिराच्या शेवटच्या दिवशी रविवारी (ता. 30) जैन इरिगेशन येथील "गांधीतीर्थ'ची सफर घडून आणण्यात येणार आहे. 

Web Title: NIE will give the artistic qualities of Balmitra