निजामपूरला अमृतमहोत्सवी रथोत्सव, आषाढोत्सवास दोनशे वर्षांची परंपरा !

प्रा.भगवान जगदाळे
मंगळवार, 24 जुलै 2018

माळमाथा परिसरातील दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील आषाढोत्सव काल (ता.23) जल्लोषात साजरा झाला. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली.
 

निजामपूर-जैताणे (धुळे)- माळमाथा परिसरातील दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील आषाढोत्सव काल (ता.23) जल्लोषात साजरा झाला. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली.

रथोत्सवाचे यंदाचे अमृतमहोत्सवी (75 वे) वर्ष होते. दुपारी चार वाजता रथ यात्रेस प्रारंभ झाला. गावातील मुख्य मार्गांवरुन टाळ-मृदुंगाच्या गजरात ही रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली. यावेळी साक्रीचे तहसीलदार संदीप भोसले यांच्यासह त्यांच्या पत्नी स्मिता भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, सरपंच साधना विजय राणे, जैताणेचे सरपंच संजय खैरनार, म्हसाई ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह, स्वामी अच्युतानंद सरस्वती, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाणी, भागवत कथाकार व प्रवचनकार विठ्ठलराय उपासनी, दयार्णव उपासनी, दिनबंधु उपासनी, डॉ. श्रीरंग उपासनी, हृषीकेश उपासनी, राजेंद्र उपासनी, डॉ. रमाकांत शिरोडे, राजेंद्रभाई शाह, माजी सरपंच अजितचंद्र शाह आदी मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी उपासनी परिवार आषाढोत्सवासह रथयात्रेचे संयोजन करत असतो.

निजामपूर ग्रामपंचायतीसह संपूर्ण उपासनी परिवार, वारकरी व भजनी मंडळाचे विशेष सहकार्य लाभले. निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातील खेड्यापाड्यावरून आलेल्या आबालवृध्दांसह शेकडो भाविकांनी व ग्रामस्थांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.

Web Title: nijampur amrutmahotsawi rathyatra news