निजामपूर-जैताणेत कडकडीत 'बंद' व 'रस्ता रोको'

प्रा. भगवान जगदाळे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणेत शिवाजीरोड, मेनरोड, चैनी रोड, खुडाणे चौफुली, रुपाली चौक व बसस्थानक परिसरातील व्यापाऱ्यांनी सोमवारी (ता. 2) दुपारी बारापर्यंत कडकडीत 'बंद' पाळला. जैताणेचा सोमवारचा आठवडे बाजार असल्याने परिसरातील शेतकरी, व्यापारी, विक्रेते व ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून दुपारनंतर सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले.

कार्यकर्त्यांनी बसस्थानकावर काही काळ 'रस्ता रोको' आंदोलनही केले. यावेळी दलित-आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शासनाविरुद्ध विविध घोषणाही दिल्या. सरपंच संजय खैरनार यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला. आंदोलनात भारिप बहुजन महासंघ, भीमगर्जना ग्रुप, एकलव्य आदिवासी युवक संग्राम संघटना, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मित्र मंडळ आदींचा सहभाग होता.

भीमगर्जना ग्रुप जैताणेचे रविराज जाधव, सिद्धार्थ जगदेव, संगम बागुल, देवाजी जाधव, सुनील जाधव, सिद्धार्थ जाधव, भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष नामदेव पिंपळे, जिल्हा उपाध्यक्ष गुलाब जगदेव, मोहन कापुरे, गंगाधर जाधव, मनोज जगदेव, गोपाल बच्छाव, सागर पवार, दीपक इंदवे, छोटू जाधव, धर्मा जगदेव, शैलेंद्र जाधव, राहुल महिरे, एकलव्य आदिवासी युवक संग्राम संघटनेचे मनोहर ठाकरे, राजेश माळचे, प्रकाश चौधरी, जितू सोनवणे, पिंटू बागले, यशवंत अहिरे, बलवंत वाघ, रवींद्र मोरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील बागले तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मित्र मंडळाचे आकाश कांबळे, भय्या साठे, किशन कांबळे, संतोष शिंदे, योगेश खरात, सागर नाळे, आबा काकडे आदी कार्यकर्त्यानी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: nijampur jaitane band and road block