नऊ कोटींचे तीन हजार किलो रक्तचंदन जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

चिपळूण - येथील वन विभागाने दोन दिवसांत तब्बल 3 हजार किलो रक्तचंदन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या रक्तचंदनाची किंमत सुमारे 9 कोटी रुपये आहे. परदेशात रक्तचंदन पाठविताना कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून लाकडी फर्निचर तयार करून त्यामध्ये रक्तचंदन लपविण्यात आले होते. वन विभागाचे कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक अधिकारी एम. के. राव आज चिपळुणात दाखल झाले.

येथील वन विभागाच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने केलेल्या दूरध्वनीवरून कोट्यवधी रुपयाच्या रक्तचंदनाची तस्करी उघडकीस आली. शुक्रवारी (ता. 30 डिसेंबर) दुपारी गोवळकोट येथे 35 लाखांचे रक्तचंदन आढळल्यानंतर यामागील आंतरराष्ट्रीय टोळीचा शोध घेण्यासाठी शनिवारी (ता. 31 डिसेंबर) वन विभागाच्या दक्षता पथकाचे उपविभागीय वनाधिकारी विजय भोसले चिपळुणात दाखल झाले होते. शुक्रवारी गोवळकोट रोड येथील एका गाळ्यामध्ये ठेवलेले रक्तचंदन आढळले होते. शनिवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणखी शोध घेतला. त्यामध्ये गुहागर बायपास आणि गोवळकोट रोड येथे एका ठिकाणी पुन्हा रक्तचंदनाचा साठा आढळला. गुहागर बायपास येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये सोफासेटचे बॉक्‍स आढळले. त्यानंतर गोवळकोट रोड येथे एका इमारतीचे काम सुरू आहे, तिथे जमिनीवर पॅकिंग करून ठेवलेले सोफासेट वन विभागाला आढळले.

Web Title: Nine crore raktchandan recovered