पिंगळे यांच्या बॅंक लॉंकरमध्ये  सापडले नऊ लाखांचे दागिने 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

नाशिक - बेहिशेबी 57 लाखांच्या रोकडप्रकरणी अटकेत असलेले नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे त्र्यंबकेश्‍वरजवळील पिंप्री येथे फार्महाउस असल्याचे निष्पन्न झाले आहे. या ठिकाणीदेखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत तपासणी करण्यात येत आहे. यासह पिंगळे यांच्या जिल्हा बॅंकेतील दोन लॉकरची तपासणी केली असता, एका लॉकरमध्ये नऊ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हस्तगत केले आहेत. आज दुसऱ्या दिवशीही विभागाकडून दिवसभर चौकशी करण्यात आली. 

श्री. पिंगळे यांना अटक करून पोलिस कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या संपत्तीचा "एसीबी'कडून शोध घेतला जात आहे. या गुन्ह्याच्या तपासणीत त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील पिंपी येथे त्यांच्या मालकीच्या फार्महाउसचा ठावठिकाणा मिळाला असून, त्याचीदेखील तपासणी विभागामार्फत केली जात आहे. शहरातील घरासह वरळी येथील एका घरात 90 जणांची मतदार ओळखपत्रे सापडली असून, त्यांचादेखील तपास सुरू आहे. पिंगळे यांच्यासोबतच बाजार समितीच्या संचालकांचीही चौकशी "एसीबी'मार्फत केली जाणार आहे. 

आज जिल्हा बॅंकेतील पिंगळे यांची दोन लॉकर उघडण्यात आली. एकात नऊ लाखांचे दागिने सापडले, तर दुसऱ्यात काहीच मिळाले नसल्याचे "एसीबी'चे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी सांगितले. 

एकंदरीत माजी खासदार पिंगळे यांच्याविरुद्ध असलेल्या गुन्ह्यात एसीबीकडून तपासाला गती मिळत असल्याचे दिसून येत आहे. बाजार समिती कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याच्या रकमेवर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून परस्पर धनादेशाद्वारे ती आपल्याकडे घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. 

संचालकांच्या पोटात भीतीचा गोळा 

सभापती पिंगळे यांना अटक झाल्यानंतर आता त्यांच्या पाठीशी 15 वर्षांपासून खंबीर उभ्या राहणाऱ्या बाजार समितीच्या काही संचालकांच्या पोटात आता भीतीचा गोळा उठला आहे. कारण सहकार कायद्यान्वये चौकशी सुरू झाल्यास बाजार समितीच्या प्रत्येक घोटाळ्यात सभापतींबरोबर त्यांच्या प्रस्तावाला मंजुरी देणारे संचालकही तेवढेच जबाबदार ठरणार आहेत. यातून सुटका आता कशी करायची?, अशी चिंता त्यांना भेडसावत आहे. त्यासाठी ते कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत. 

Web Title: Nine hundred ornaments found in Pingle's Bank lonkara