#वारी_सलोख्याची नाशिक : नाथांच्या जयघोषात निवृत्तीनाथांच्या पालखीचे पंढरपुरकडे प्रस्थान

Nivrittinath palkhi going towards pandharpur from nashik
Nivrittinath palkhi going towards pandharpur from nashik

नाशिक : टाळ मृदुंगाच्या निनादात व अभंग गात निवृत्तीनाथांची पालखी पंढरपुरकडे निघाली. आषाढी एकादशीसाठी प्रतिवर्षीप्रमाणे ज्येष्ठ पौर्णिमेस निघणारी निवृत्तीनाथांची पालखी नाथांचा जयघोष करीत हजारो वारकऱ्यांच्या समवेत पंढरपुरकडे रवाना झाली. पालखी त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आली असता विश्वस्थ प्रशांत गायधनी यांनी मानकरी व पालखीचे पुष्पहार देउन स्वागत केले. 

तत्पुर्वी निवृत्तीनाथ समाधी मंदिरात समाधीची नित्य पुजा झाल्यावर सजविलेल्या पालखीत ​श्रींच्या चांदीच्या पादुका व प्रतिमा ठेवण्यात आली. त्यानंतर या देवस्थानच्या विश्वस्थांसह, पुजक व परंपरेचे मानकरी यांच्या वतीने टाळ, मृदुंगाच्या निनादात भजन करीत सवाद्य पालखी कुशावर्त तीर्थावर स्नानास आणण्यात आली.

येथे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सपत्नीक नाथांची पुजा केली. पालखी त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आली असता विश्वस्थ प्रशांत गायधनी यांनी मानकरी व पालखीचे पुष्पहार देउन स्वागत केले. पालखीस ग्रामस्थांनी प्रवेश नाक्याजवळ निरोप दिला. सर्वत्र पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com