निजामपूर-जैताणेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 16 एप्रिल 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : निजामपूर-जैताणेसह संपूर्ण माळमाथा परिसरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त ग्रामस्थांसह विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय पक्ष, संघटना व संस्थांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.

निजामपूर-जैताणे (धुळे) : निजामपूर-जैताणेसह संपूर्ण माळमाथा परिसरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त ग्रामस्थांसह विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय पक्ष, संघटना व संस्थांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.

उत्सव समितीतर्फे अभिवादन व मिरवणूक...
सार्वजनिक जयंती-उत्सव समितीतर्फे रात्री १२ वाजून ०१ मिनिटांनी केक कापून बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच सकाळी ९ वाजता जैताणे ग्रामपंचायत चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर प्रतिमापूजन करून त्रिसरण, पंचशील, बुद्धवंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जि.प. सदस्या उषाबाई ठाकरे, पं.स. सदस्य उत्पल नांद्रे, वासुदेव बदामे, सरपंच संजय खैरनार, सदस्य ईश्वर न्याहळदे, प्रकाश पाटील, युसूफ सैय्यद, राजेश बागुल, किरण बच्छाव, दशरथ शेलार, रघुवीर खारकर, सुका चव्हाण, राजेंद्र सावंत आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते. सरपंच संजय खैरनार, राजेश बागुल, संजय पिंपळे, हर्षवर्धन दहिते आदींनी मनोगते व्यक्त केली. एंजल अनिल बागले, आणि ऐश्वर्या अविनाश जाधव या बालिकांनीही मनोगते मांडली. त्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. अनुराग भगवान जगदाळे या बालकलाकाराने भीमगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अनुरागलाही रोख बक्षिसे देण्यात आली. जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते ह्यांनी त्याचा शाल-श्रीफळ देऊन विशेष सत्कार केला. उत्सव समितीतर्फे पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला. प्रा. भगवान जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. देवाजी जाधव यांनी आभार मानले. सायंकाळी ५ वाजता जैताणेतील आंबेडकरनगरपासून दोन्ही गावांतील मुख्य मार्गांवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत आबालवृध्दांसह महिला, युवक-युवती व दलित समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष रविराज जाधव, सचिव देवाजी जाधव, खजिनदार सिद्धार्थ जगदेव, प्रसिद्धी प्रमुख संगम बागुल, सदस्य नामदेव पिंपळे, गोपाल बच्छाव, प्रकाश मगर, गुलाब जगदेव, सुनील जाधव, सागर पवार, भटू पिंपळे, मनोज जगदेव, दीपक जगदेव, राहुल जाधव, गोलू बच्छाव, रोहित जाधव, शशिकांत पिंपळे, ऋषिकेश पिंपळे, आनंद पिंपळे, जितेंद्र जाधव, शुभम वाघ, समाधान खरे, प्रकाश बच्छाव आदींनी परिश्रम घेतले.

निजामपूर ग्रामपंचायत व जवाहरलाल वाचनालयातर्फे अभिवादन...
निजामपूर ग्रामपंचायत व जवाहरलाल वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते ऍड. शरदचंद्र शाह, सरपंच साधना राणे, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह, सचिव नितीन शाह, प्रमुख वक्ते प्रा.डॉ. रवींद्र ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य सलीम पठाण, रजनी वाणी, मालुबाई शिरसाठ, इंदूबाई भिल, परेश वाणी, जाकीर तांबोळी, सुनील बागले आदींच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुहासभाई शाह, भुपेश शाह, कमलेश शाह, संजय शाह, रघुवीर खारकर, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. अशोक पानपाटील यांनी बुद्धवंदना सादर केली. प्रमुख वक्ते प्रा.डॉ. रवींद्र ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. शुभम शाह या आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुलच्या चौथीच्या विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेत संविधान वाचन केले. तर अनुराग जगदाळे हया आदर्श विद्या मंदिराच्या नववीच्या विद्यार्थ्याने भीमगित सादर करून उपस्थितांची मने जिंकली. निजामपूर ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींना सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते वॉटर बॅग व टिफिन बॉक्सचेही वाटप करण्यात आले. चंद्रकांत शिंपी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. वाचनालयाचे व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आदर्श विद्या मंदिरातर्फे अभिवादन...
निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात ग्रंथालयाच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. संस्थेचे सचिव नितीन शाह, मुख्याध्यापक जयंत भामरे, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, सुरेश माळी, अशोक पानपाटील, गोपीचंद नेरकर आदींच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जैताणे ग्रामपंचायतीतर्फे अभिवादन...
जैताणे (ता.साक्री) ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीतर्फे सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे आदींच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्याबाई होळकर पाणपोईचे उदघाटन...
ईश्वरभाऊ न्याहळदे मित्रपरिवार व शिक्षक मित्रपरिवारातर्फे डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त बस स्टँडवरील पोलीस चौकीजवळ जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते, निजामपूर पोलीस स्टेशनचे एपीआय दिलीप खेडकर, पंचायत समिती सदस्य उत्पल नांद्रे, वासुदेव बदामे, जैताणेचे उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, प्राथमिक शिक्षक प्रकाश मगरे, विठोबा न्याहळदे, राकेश भलकारे, पप्पू धनगर आदींच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता अहिल्याबाई होळकर पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.

Web Title: nizampur jaitaneet greetings to dr babasaheb ambedkar