राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये रोकड कमी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

तळोदा - शासनाने अमर्याद रोकड काढण्याची मुभा दिली आहे. शहरातील इतर बॅंकांमध्ये पुरेशी रक्कम काढता येत आहे. मात्र राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये रक्कम मिळत नसल्याने ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहेत. येथील स्टेट बॅंकेत फक्त दहा रूपये काढता येतील असा फलक लावलेला होता. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज पडत आहे. याचा विचार करून पुरेशी रक्कम उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी होत आहे. 

आठ नोव्हेंबरच्या नोटा बंदीनंतर बॅंकामधून कॅश काढायला मर्यादा लादल्या गेल्या. टप्प्याटप्प्याने मर्यादा शिथिल करण्यात आल्या. 13 मार्चनंतर कॅश' काढण्यावरची मर्यादा उठविली गेली. त्यानंतर कितीही रक्कम काढू शकतात मात्र शहरातील स्टेटबॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदा, सेंट्रल बॅंक आदींमध्ये आजही मर्यादित स्वरूपात रक्कम उपलब्ध करुन दिली जाते. दहा, वीस, तीन हजारच काढा अशा सूचनांचा फलक रोज लावला जातो. वरूनच रक्कम कमी मिळाली आहे. असे कारण सांगितले जाते. या बॅंकांमध्ये शासनाचा विविध योजनांचे लाभार्थी, नोकरदारांचे वेतन, शेतकऱ्यांचे खाते आहेत. शेतकऱ्यांच्या खरीप हंगामी मालापासून, रब्बीचा पिकांची विक्री झाली. त्याची रक्कम धनादेशद्वारा खात्यात जमा झाली आहे. मजूरांसह विविध कामासाठी शेतकऱ्यांना रोकडची गरज भासते. मात्र बॅंकांमध्ये ते पुरेशी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील एटीएम कधी सुरू होते हेच कळत नाही. तो संशोधनाचा विषय ठरला आहे.

Web Title: no cash in bank