'गिरणा' धरणात एक टक्का ही वाढ नाही

सुधाकर पाटील 
सोमवार, 8 जुलै 2019

'गिरणा' धरण 57 टक्के  पाणीसाठा झाल्याची एक बातमी सध्या गिरणा पट्ट्यात सोशल मिडीयावर फिरत आहे. मात्र प्रत्यक्षात गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात आतापर्यंत एक टक्काही वाढ झाली नसल्याचे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी हेमंत पाटील यांनी 'सकाळ 'शी बोलतांना सांगीतले.

भडगाव : 'गिरणा' धरण 57 टक्के  पाणीसाठा झाल्याची एक बातमी सध्या गिरणा पट्ट्यात सोशल मिडीयावर फिरत आहे. मात्र प्रत्यक्षात गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात आतापर्यंत एक टक्काही वाढ झाली नसल्याचे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी हेमंत पाटील यांनी 'सकाळ 'शी बोलतांना सांगीतले. कोणीतरी मागील बातमीच्या तारखेत खाडाखोड करून बातमी व्हायरल केली आहे. 

निम्म्या जळगाव जिल्ह्याची पिण्याच्या पाण्याची व जमीनीची तहान भागविणारे 'गिरणा' धरण 57 टक्के भरल्याची एक बातमी जिल्ह्यात वार्यासारखी सोशल मिडीयाच्या ग्रुपवर व्हायरल होत आहे. संबंधित बातमीला 7 जुलै 2019 ला प्रसिद्ध झाल्याचे दाखविण्यात आली आहे. प्रत्यक्षात संबंधित बातमी जुनी असून कोणीतरी तारखेत बदल करून कालची बातमी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रत्यक्षात गिरणा धरणात अजुनपर्यंत एक टक्काही पाणीसाठा वाढ झालेली नसल्याचे पाटबंधारे विभागाने उपविभागीय अधिकारी हेमंत पाटील, शाखा अभियंता एस.आर.पाटील यांनी 'सकाळ' शी बोलतांना सांगीतले. त्यामुळे सोशल मीडीयावर फीरणारी बातमी धादातं खोटी आहे.

धरणात अवघा 7 टक्के साठा
धरणात सद्यस्थितीला 7 टक्के जिवंत पाणीसाठा आहे. यंदा एक टक्काही त्यात वाढ झाली नाही. गिरणा धरणाची 21 हजार 500 दक्षलक्ष घनफुट एवढी साठवण क्षमता आहे. धरणात 7 टक्के जीवंत पाणीसाठा वगळून 3 हजार दशलक्ष घनफुट एवढा मृतसाठा आहे. 

सोशल मीडीयावर फीरणारी बातमी पुर्णपणे खोटी आहे. धरणात अवघा 7 टक्के पाणीसाठा आहे. यंदा अजुनपर्यंत एक टक्काही वाढ झालेली नाही. त्यामुळे नागरीकांनी खोट्या बातमीवर विश्वास ठेऊ नये 
- हेमंत पाटील उपअभियंता पाटबंधारे विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no increase in water level of Girana Dam