नाशिकला तीन दिवसांपासून नोटांचा पुरवठाच नाही 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

नाशिक - महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे वेतनाचा आठवडा. खात्यावर जमा झालेली वेतनाची रक्कम काढण्यासाठी पगारदारांनी विविध बॅंकांत गर्दी केली असताना, दुसरीकडे रिझर्व्ह बॅंकेकडून मात्र गेल्या तीन दिवसांपासून नाशिकच्या स्टेट बॅंकेला नोटांचा पुरवठाच झालेला नसल्याचे उघडकीस आले आहे. पुरेशी रोकड उपलब्ध नसल्याने राष्ट्रीयीकृत बॅंकांचे नियोजन कोलमडले असून, नोकरदारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. 

चलनबदलानंतर जवळपास 16 चेस्ट बॅंका असलेल्या नाशिक जिल्ह्याला आतापर्यंत पुरेशा प्रमाणात नोटांचा पुरवठा सुरू होता. पण तीन दिवसांपासून मात्र रिझर्व्ह बॅंकेकडून स्टेट बॅंकेला होणारा नोटांचा पुरवठा जवळपास बंद आहे. त्यामुळे आगामी आठवड्यात नाशिककरांवरील आर्थिक ताण वाढण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत 1450 कोटी रुपये मिळालेल्या नाशिक जिल्ह्यात 850 कोटींचे वाटप झाले. पण इतर जिल्ह्यांतून नोटांची मोठ्या प्रमाणावर मागणी सुरू झाल्याने नाशिक जिल्ह्यातील बॅंकांकडील पैसा इतरत्र वळवायला सुरवात झाली आहे. चांदवड येथून ठाणे जिल्ह्याला पैसे पाठविले गेले आहेत. नागपूर व यवतमाळसह काही भागांत पैशाची निकड असल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेकडून नोटांचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. 

Web Title: No notes from the three-day supply in Nashik