रुग्णालयांचा ना हरकत दाखल्यांचा मार्ग जवळपास मोकळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

कोलकाता येथे तीन वर्षांपुर्वी एका मोठ्या रुग्णालयाला आग लागली. त्यानंतर रूग्णालये, दवाखाने उभारण्याचे नियम कठोर करण्यात आले. रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवणे, वीस ते पन्नास हजार लिटर पाणी क्षमता असलेले टाक्‍यांची निर्मिती करणे या कायद्यानुसार बंधन कारक करण्यात आले आहे.

नाशिक - शहरातील निवासी भागात बहुतांश दवाखाने, रुग्णालये व नर्सिंग होम आहे. त्याना परवानगीसाठी अग्निशमन दलाची परवानगी आवश्‍यक असते. पण किचकट नियमांमुळे परवानगी घेता येत नाही. शहरातील बाराशेहून अधिक दवाखाने व रुग्णालये अनाधिकृत ठरण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महासभेने केलेल्या एका ठरावानुसार अग्निशमन दलाने ना हरकत दाखले देण्यासाठी नियमावली तयार केली आहे. त्यामुळे शहरात अनाधिकृत ठरलेले दवाखाने व रुग्णालये नियमित होण्याचा मार्ग यानिमित्ताने मोकळा होणार आहे.

कोलकाता येथे तीन वर्षांपुर्वी एका मोठ्या रुग्णालयाला आग लागली. त्यानंतर रूग्णालये, दवाखाने उभारण्याचे नियम कठोर करण्यात आले. रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवणे, वीस ते पन्नास हजार लिटर पाणी क्षमता असलेले टाक्‍यांची निर्मिती करणे या कायद्यानुसार बंधन कारक करण्यात आले आहे. नाशिक शहरात सुमारे सोळाशेच्या आसपास नर्सिंग होम, दवाखाने व रुग्णालये आहेत. त्यातील काही नर्सिंग होम बंद पडले आहे.

जवळपास तीनशे रुग्णालयांनी नव्या नियमाप्रमाणे तरतुदी करून अग्निशमन दलाचा परवाने प्राप्त करून घेतले आहेत. पण बाराशेहून अधिक रुग्णालये निवासी भागात असल्याने त्यांना अग्निशमन दलाच्या नवीन नियमांचे पालन करणे शक्‍य नसल्याने त्यांना अग्निशमन विभागाकडून परवाना मिळाला नाही. व अनेक रुग्णालयांनी दवाखाने, रुग्णालये अनाधिकृत ठरण्याच्या भितीने परवाने प्राप्त करून घेतले नाहीत. याच संदर्भात महासभेत चर्चा झाल्यानंतर जुन्या नर्सिंग होम, दवाखाने व रुग्णालयांना नियमात शिथिलता देण्याचा ठराव संमत करण्यात आला होता.

Web Title: no objection certificate for hospital

टॅग्स