'गिरणा'च्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने धाकधूक!

शिवनंदन बाविस्कर
सोमवार, 16 जुलै 2018

पिलखोड (जळगाव) : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने गिरणा धरणाच्या साठ्यात म्हणावी तशी वाढ नाही. धरणात दहा टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिलखोड (जळगाव) : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने गिरणा धरणाच्या साठ्यात म्हणावी तशी वाढ नाही. धरणात दहा टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गतवर्षी जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे गिरणेच्या साठ्यात चांगली वाढ होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, यंदा पावसाने घोर निराशा केली आहे. धरण क्षेत्रात व त्याच्या उगमस्थानी अजुनही चांगला पाऊस नसल्याने धरणात पाण्याची आवक नाही. गिरणाच्या वरील भागात असलेल्या चणकापूर व पुनद या दोन प्रमुख प्रकल्पांसह हरणबारी, केळझर व नाग्यासाक्या या मध्यम प्रकल्पात अद्यापही अपेक्षित पर्जन्यमान झालेले नाही.  

पुनद धरणात झालेल्या थोड्याफार पावसामुळे त्यातून 702 क्यूसेक विसर्ग कालपर्यंत सुरु होता. तर गिरणा नदीवर असलेल्या ठेंगोडा बंधाऱ्यातून 305 क्यूसेकचा विसर्ग धरणात सुरु आहे. शनिवारी(ता. 14) धरण क्षेत्रात 5 मिमी एवढा किरकोळ पाऊस झाला, त्या दिवशी धरणात 9.80 टक्के साठा होता. तो रविवारी(ता. 15) 9.96 टक्के म्हणजे दहा टक्के एवढा झाला आहे. सध्या धरणात एकूण 4 हजार 842 दशलक्ष घनफुट साठा असून 1 हजार 842 दशलक्ष घनफुट एवढा जिवंत साठा शिल्लक आहे. तर धरणात 34.92 दशलक्ष घनफुट एवढी आवक होत आहे, अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. धरण भरण्याच्या दृष्टीने जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

'गिरणा'वरील धरणांतील साठा...
चणकापूर - 42.89 टक्के
पुनद - 46.96 टक्के 
हरणबारी - 21.8 टक्के 
केळझर - 11.36 टक्के 

Web Title: no rain in area of girana citizens in tensions