शेवटच्या दिवशी अपेक्षित गर्दी नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

बॅंकांना दिलासा; जमा नोटांचे विवरण रिझर्व्ह बॅंकेला सादर
जळगाव - केंद्र सरकारने चलनातून बाद केलेल्या पाचशे व हजाराच्या नोटा बॅंकांमध्ये जमा करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोटा भरण्यासाठी गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे न होता विविध बॅंकांमध्ये आज नेहमीप्रमाणेच भरणा करण्यासाठी ग्राहकांची हजेरी होती, असे सांगण्यात आले. दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार आजअखेर विविध बॅंकांमध्ये जमा झालेल्या पाचशे व हजाराच्या नोटांचे विवरण त्या-त्या बॅंकांची ‘चेस्ट’ व रिझर्व्ह बॅंकेला कळविण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर करत या सर्व नोटा बॅंकांमध्ये जमा करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत दिली. त्यानुसार गेल्या पन्नास दिवसांत लाखो कोटी रुपयांच्या या नोटा विविध बॅंकांमध्ये जमा झाल्या आहेत. 

आज गर्दी नाही
चलनातून बाद केलेल्या नोटा भरण्याचा आज अंतिम दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहकांची बॅंकांमध्ये गर्दी होईल, अशी शक्‍यता होती. विविध बॅंकांनी त्यासाठी अतिरिक्त काउंटरची व्यवस्थाही करून ठेवली होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे कुठल्याही बॅंकेत नोटा भरण्यासाठी म्हणून गर्दी झाली नाही. स्टेट बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बॅंक यासह आयसीआयसीआय, एचडीएफसी व जळगाव जनता सहकारी बॅंक, जळगाव पीपल्स बॅंक यासारख्या सहकारी बॅंकांमध्येही नोटा भरण्यासाठी कोणत्याही शाखेत गर्दी झाल्याचे दिसले नाही. 

‘चेस्ट’ बॅंकेत भरणा
विविध बॅंकांना त्यांचे व्यवहार करण्यासाठी, रोकड जमा करणे व घेण्यासाठी म्हणून रिझर्व्ह बॅंकेने ‘चेस्ट’ बॅंका ठरवून दिल्या आहेत. त्यानुसार आजअखेर जमा झालेली पाचशे व हजाराच्या नोटांच्या स्वरूपातील सर्व रक्कम या ‘चेस्ट’ बॅंकेकडे जमा करायची आहे. त्यानुसार बहुतांश बॅंकांनी आजअखेरची जमा रक्कम ‘चेस्ट’ बॅंकांकडे जमा केली आहे. ग्रामीण भागातील शाखांमधून जमा होणारी रक्कम उद्या (३१ डिसेंबर) सकाळपर्यंत संबंधित बॅंकांत जमा केली जाणार आहे. 

जुन्या नोटांच्या स्वरूपात जमा झालेली रक्कम स्टेट बॅंक, सेंट्रल बॅंक या ‘चेस्ट’ बॅंकांमध्ये जमा केली आहे. काही रक्कम ग्रामीण भागातून रात्रीपर्यंत प्राप्त होईल, ती उद्या (३१ डिसेंबर) सकाळीच संबंधित बॅंकांमध्ये जमा करू. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार त्यांना या सर्व जमा रकमेचा तपशील सादर केला आहे. 
- अनिल पाटकर, सीईओ, जळगाव पीपल्स को.-ऑप. बॅंक. 

चलनातून बाद केलेल्या पाचशे व हजाराच्या नोटा भरण्यासाठी आज शेवटचा दिवस असला, तरी कुठल्याही शाखेत गर्दी झाली नाही. उलटपक्षी काही शाखांमध्ये तर दोन-चार नोटाच जमा झाल्या. या सर्व नोटांचे विवरण रिझर्व्ह बॅंकेला कळविण्यात आले आहे. 
- पुंडलिक पाटील, सीईओ, जळगाव जनता सहकारी बॅंक

Web Title: No rush expected at the end of the day