वरखेडे (ता.चाळीसगाव) येथे नरभक्षक बिबट्या मोकाटच

leopard-hunting
leopard-hunting

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) - वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील महिलेला बिबट्याने ठार केल्याच्या घटनेनंतर आज (शनिवार) जवळच्या तिरपोळे शिवारात बिबट्याचे दर्शन घडले.त्यामुळे त्याच्या मागावर असलेल्या वनविभागाच्या पथकाने ड्रोन कॅमेरा लावून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो या कॅमेर्‍यात ट्रॅप झालाच नाही.तिरपोळेत चार तासाहुन अधिक वेळ हे पथक थांबुन होते.योग्य नियोजन नसल्याने बिबट्यास पथकाला पकडता आले नाही. परिणामी त्याची भिती कायमआहे.  

वरखेडे येथील दिपाली जगताप या महिलेचा बळी गेल्यानंतर वनविभागाने या भागात तिन पिंजरे लावली आहेत.यापैकी एकही पिंजऱ्यात अद्यापपर्यत  बिबट्या अडकला नाही. आज दुपारी बाराला तिरपोळे येथील भगवान अमरसिंह पाटील यांच्या कोंबडी फर्म लगतच्या शेतातून जगदिश मनोहर आहीरे हा तरूण नेहमी प्रमाणे बैलगाडी घेवुन शेतातकडे जात होता.जवळच्या कोळ्या नाल्यातुन बिबट्याने अचानक बैलाच्या तोंडाजवळ उडी मारली व तो  नाल्यात गेल्याचे त्याने  पाहीले. तेथून घाबरून त्यानी घडलेली घटना वडीलांना सांगितले.तात्काळ वनविभागाच्या अधिकार्याना कळविल्यानंतर ज्या ठीकाणी बिबट्या अढळुन आला होता.त्या ठीकाणी वनविभागाचे पथक आले.  
 
जळगावचे पथकही दाखल

वनविभागाच्या पथकासोबत आलेले वन्यजीव आभ्यासक विवेक देसाई यांनी 'ड्रोन कॅमेरा'  हवेत उडविला.सुरवातीला हा बिबट्या ड्रोन कॅमेर्‍यात कैद झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.मात्र प्रत्यक्षात त्यात तो दिसला नसल्याचे वनविभागाच्या अधिकार्याकडुन सांगण्यात आले.बिबट्या ज्या ठिकाणी दिसला त्या भागात मोठ्या प्रमाणावर पडीक जमीन आहे.त्या जागेवर मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपेही मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत.जवळच्या कोळ्या नाल्यात पंधरा ते वीस फुट खोल दाट झाडीतच बिबटय़ा सुस्त बसलेल्या अवस्थेत वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांना दिसला. 

बेशुद्ध करण्याची तयारी

बिबट्या दिसल्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्याला बेशुद्ध करण्यासाठी तयारी सुरू केली.यावेळी  नियोजनाचा अभाव दिसुन आला.रायफलला  लावण्यात आलेल्या गोळीत  औषध भरण्यासाठी मोठी आकाराची सिरीन पाहीजे होते ,ते नव्हते.त्यामुळे तिरपोळेहुन  मेहुणबारे येथे जावुन नविन  सिरीज मागविण्यात आली.ती  देखील उपयोग न आल्याने शेवटी प्रेशर देवुन इंजेक्शन भरून रायफलमध्ये लोड करण्यात आले.मात्र तो पर्यंत बिबट्या तेथून गायब झाला होता.या ठीकाणी वनविभागाने सुरवातीपासुनच योग्य नियोजन केले असते तर बिबट्याला बेशुद्ध करता आले असते असे  ग्रामस्थांनी सांगितले.

नाल्यातच बिबट्याचा पडाव ? 

कोळ्या नाल्यात दाट झाडाझुडपामधील नाल्यातच  बिबट्याचा पडाव असल्याचे वनअधिकारी यांनी सांगितले. या भागात त्यांना  बिबटची विष्टाही अढळुन आली.त्यामुळे बिबट्याचा पडाव या ठीकाणीच असुन, त्याला या भागात खाण्यासाठी रानडुक्कर मोठ्या प्रमाणात असल्याने आयते खाद्य मिळत आहे. आज वन विभागाने या ठीकाणी पिंजरा लावण्याचे नियोजन  केले आहे.दरम्यान  तिरपोळे भागातील शेतकर्यामध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.त्याला पकडण्यासाठी वन विभागाने  अमळनेर पारोळा पाचोरा जळगाव  तालुक्यातुनही अतिरिक्त  कर्मचारी बोलविले होते. घटनास्थळी चाळीसगावचे नगरसेवक भगवान पाटील यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे याच्याशी चर्चा करून बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली.

चाहुल लागताच बिबट्या पसार...

नाल्यात बसलेल्या बिबट्याला   उठवून वर मोकळ्या जागेत आणण्यासाठी वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी मोठ्या हिमतीने हातात काठी व पाठिवर बॅग घेतली अन् ते नाल्यात उतरले.त्यांच्या मागे शार्पशुटरही होता.सुर्याची किरणे बिबट्या पर्यंत पोहचणार नाहीत एवढ्या दाट झाडीत ठोंबरे यांनी काठी वाजवताच त्यांच्यापासुन चार फुट अंतरावर असलेला बिबट्या ताडकन उठला व सरळ नाल्यातच निघुन गेला. यावेळी अजुबाजुच्या गावातील ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com