भिमा कोरेगाव घटनेचे पडसाद : अमळनेरला सात बस फोडल्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

चोपडा रस्त्यावर गजानन महाराज मंदिराजवळ दगडफेक करीत चोपडा धुळे बसच्या व धुळे रस्त्यावर बसच्या काचा फोडल्या. यात चालक मोहन पवार हे जखमी झाले आहेत. दुपारी तीनच्या सुमारास चक्का जाम करण्यात आला. यावेळी पोलिसांनी शहरात गस्त वाढवली असून त्यानंतर बस चालकांना आश्वासित केल्यानंतर काही बस सुरू करण्यात आल्या आहेत

अमळनेर - भीमा कोरेगाव, सणसवाडी परिसरातील दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे पडसाद मंगळवारी येथे आज शहरात उमटले. यात सात बसची तोडफोड झाली असून, एक चालक जखमी झाला आहे, अशी माहिती आगार प्रमुख एम. बी सैंदाणे यांनी दिली. 

शहरात काल (ता. 1) मध्यरात्री व आज नवापूर (एमएच 14 बीटी 2114), शिरपूर (एमएच20बी0937), शिंदखेडा (एमएच14 बीटी 2086), अमळनेर आगाराच्या (एमएच06 एस8493), (एमएच40एन9029), (एमएच14 बीटी 1851) शिंदखेडा आगाराची (9072) या बसच्या काचा फोडल्या. चोपडा रस्त्यावर गजानन महाराज मंदिराजवळ दगडफेक करीत चोपडा धुळे बसच्या व धुळे रस्त्यावर बसच्या काचा फोडल्या. यात चालक मोहन पवार हे जखमी झाले आहेत. दुपारी तीनच्या सुमारास चक्का जाम करण्यात आला. यावेळी पोलिसांनी शहरात गस्त वाढवली असून त्यानंतर बस चालकांना आश्वासित केल्यानंतर काही बस सुरू करण्यात आल्या आहेत.

शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. घटनेतील संशयितांचा पोलिस कसून शोध घेत असून, तीन ते चार जणांना ताब्यात घेतले आहे. 

Web Title: north maharashtra news: agitation