माझा पक्षच मला बाहेर ढकलत आहे - खडसे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

रावेर - मी संघर्ष करून हा पक्ष उभा केला, तो सोडण्याची माझी इच्छा नाही; पण माझाच पक्ष मला बाहेर ढकलत आहे. मला तसेच करण्यास भाग पाडले जात असेल, तर पर्याय उरणार नाही, असे वक्तव्य भाजप नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आज रावेर येथे एका कार्यक्रमात केले. त्या वेळी कार्यक्रमात उपस्थित कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी श्री. खडसे हे स्वाभिमानी नेते असल्याचे सांगून तुम्ही पक्षातून ढकलले जाण्याची वाट पाहू नका, निर्णय घ्या, आमचे दरवाजे उघडे आहेत, अशा शब्दांत खडसेंना खुले निमंत्रण दिले.

रावेर - मी संघर्ष करून हा पक्ष उभा केला, तो सोडण्याची माझी इच्छा नाही; पण माझाच पक्ष मला बाहेर ढकलत आहे. मला तसेच करण्यास भाग पाडले जात असेल, तर पर्याय उरणार नाही, असे वक्तव्य भाजप नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आज रावेर येथे एका कार्यक्रमात केले. त्या वेळी कार्यक्रमात उपस्थित कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी श्री. खडसे हे स्वाभिमानी नेते असल्याचे सांगून तुम्ही पक्षातून ढकलले जाण्याची वाट पाहू नका, निर्णय घ्या, आमचे दरवाजे उघडे आहेत, अशा शब्दांत खडसेंना खुले निमंत्रण दिले. त्यावर व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी खडसेंसाठी आमचेही दरवाजे उघडे असल्याचे सांगितले. जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हे नेते एकत्र आले होते. खडसे म्हणाले, की मी कालच पक्षनेत्यांना प्रश्न केला आहे, की मी किती भ्रष्टाचार केला? मी चोर, बदमाश, गुन्हेगार, भ्रष्टाचारी असेल तर पुरावे द्या. मी पुढची 15/20 वर्षे तुरुंगात जायला तयार आहे. त्यानंतर आपली उद्विग्नता खडसे यांनी ममता चित्रपटाच्या गाण्यातून व्यक्त केली. ते म्हणाले की, "रहते थे कभी जिनके दिल में हम जान से भी प्यारों की तरह, बैठे है उनके ही कुजे में गुनाहगारों की तरह.' 

13 हजार शेतकरी आत्महत्या 
चव्हाण म्हणाले, की युती सरकारच्या काळात सुमारे 13 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही हे सरकार तातडीने निर्णय घेत नाही, मार्ग काढत नाही. सरकारचे नेतृत्व सक्षम नाही. आघाडी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या करत असताना सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्या वेळी विरोधी पक्षनेते असलेले एकनाथराव खडसे यांनी केली होती. आजही त्यांचे हेच मत असेल, असा चिमटा चव्हाण यांनी घेतला.

Web Title: north maharashtra news raver eknath khadse bjp