उत्तर महाराष्ट्राला रस्ते विकासाची दिवाळी बंपर भेट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

नाशिक - शाश्‍वत विकासासाठी कटिबद्ध असलेल्या केंद्र सरकारने उत्तर महाराष्ट्राला रस्ते विकासाची दिवाळी बंपर भेट दिली आहे. परिसर दळणवळणदृष्ट्या सक्षम करून व्यावसायिकांसह शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग देण्याच्या दृष्टीने रस्ते विकासासाठी तब्बल 36 हजार 912 कोटींची कामे मंजूर केली आहेत. या कामांचा प्रारंभ केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (ता. 5) नवापूर व नाशिक या ठिकाणी होणार आहे.

राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असलेल्या रस्ते विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने केंद्र सरकारने विविध महामार्गांचे विस्तारीकरण व त्याला जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवत त्या दृष्टीने पावलेदेखील उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी दळणवळणाच्या प्रश्‍नाला कायमस्वरूपी विराम देण्याकरिता केंद्र सरकारने राज्याला दिलेल्या 80 हजार कोटींपैकी 36 हजार 912 कोटी हे एकट्या उत्तर महाराष्ट्राला दिले आहेत. या कामांचा प्रारंभ शनिवारी (ता. 5) फलोत्पादन परिषदेच्या उद्‌घाटनानंतर नाशिक येथील के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणावर व दुसरा कार्यक्रम नवापूर येथे होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध मंत्री उपस्थित असणार आहेत.

दोन मार्ग लवकरच राष्ट्रीय महामार्ग
रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या दोन मार्गांच्या विस्तारीकरणाबरोबर त्या मार्गांचे लवकरच राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार आहे. यात प्रामुख्याने नाशिक-जव्हार-कासा खुर्द-डहाणू-बोर्डी व सिन्नर-घोटी-त्र्यंबकेश्‍वर-मोखाडा-जव्हार-मनोर-पालघर या मार्गांचा समावेश असणार आहे.

Web Title: north maharashtra road development