नोटा बंदीमुळे भारताची आधुनिकतेकडे वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

जळगाव - जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "कॅशलेस' व्यवहार वाढण्याच्या दृष्टीने घेतला आहे. यामुळेच "कॅशलेस' व्यवहार ही संकल्पना आता दृढ होऊ लागली आहे. हा निर्णय नागरिकांसाठी त्रासदायक असला, तरी नोटा बंदीच्या निर्णयामुळे भारताने आधुनिकतेकडे एक पाऊल टाकले असल्याचे मत सीए जयेश दोषी यांनी आज येथे मांडले.

"सहकार भारती'तर्फे आज जळगाव जनता बॅंकेच्या सभागृहात आयोजित "कॅशलेस व्यवहार' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी "सहकार भारती'च्या उत्तर महाराष्ट्र सहचिटणीस रेवती शेंदुर्णीकर, विजय कुलकर्णी, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. श्री. दोषी म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून अनेकवेळा सूचना देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी घेतलेला विमुद्रीकरणाचा निर्णय व त्यानंतर एक एप्रिल 2017 पासून देशात लागू होणारा "जीएसटी' यामुळे त्यांनी ही हिंमत केली आहे. सद्यःस्थितीत विमुद्रीकरणामुळे होणारा त्रास आणखी मार्चपर्यंत सहन करावा लागेल.

या देशात तत्कालीन सरकार त्यानंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये पराभूत झाले. यामुळे नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय मोठ्या जिकिरीचा असल्याचे दोषी यांनी सांगितले. हा निर्णय घेतल्यानंतर सहकार क्षेत्र बंद पडेल, अशी शक्‍यता व्यक्त केली जात असून, या निर्णयानंतर होणारा "कॅशलेस'चा वापर यामुळे सहकार क्षेत्रातील पतसंस्थांकडे ग्राहकांचा कल राहणार नसल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Notes ban moving modern India