ई-पॉस मशीन न वापरणाऱ्या विक्रेत्यांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

नांदगाव -  ई-पॉस मशीन द्वारे अनुदानित रासायनिक खतांची विक्री न करणाऱ्या जिल्ह्यातील १९७ परवाना धारीत विक्रेत्यांवर जीवनावश्यक वस्तू कायदान्वये कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.  

नांदगाव -  ई-पॉस मशीन द्वारे अनुदानित रासायनिक खतांची विक्री न करणाऱ्या जिल्ह्यातील १९७ परवाना धारीत विक्रेत्यांवर जीवनावश्यक वस्तू कायदान्वये कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.  

सध्या काही परवाने धारक त्यांना देण्यात आलेल्या ई-पॉस मशीनचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही विक्रेते चढ्या भावाने अशा प्रकारच्या अनुदानित खतांची विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने करणे दाखवा नोटीस बजावीत कारवाई करण्याचा इशारा दिला. नांदगाव तालुक्यात ई-पॉस मशीनचा वापर न करता विक्री करणारे अकरा परावाने धारकांना नोटीस बजाविण्यात आल्याने विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. 

आज (बुधवारी) तालुका पंचायत समितीमध्ये त्यांना याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले. अनेक विक्रेत्यांनी त्यांना देण्यात आलेली ई-पॉस मशीन अपडेट केलेले नाहीत. अथवा ते त्याचा वापर करीत नसल्याचे आढळून आले. जिल्ह्यात सर्वाधिक नोटिसा निफाडमधील विक्रेत्यांना बजाविण्यात आल्या आहेत. 
निफाडला २७ तर त्र्यम्बकला अवघ्या दोन विक्रेत्यांना नोटीस बजाविण्यात आल्या. ई-पॉस मशीन न वापरणाऱ्या विक्रेत्यांची संख्या पुढीलप्रमाणे 

नांदगाव ११, सिन्नर १२, येवला १३, नाशिक १७, सटाणा १५, मालेगाव १४, चांदवड ११, सुरगाणा ४, देवळा ८, निफाड २७, दिंडोरी १७, इगतपुरी १७, कळवण १३, त्र्यम्बक २ 

Web Title: Notices to Marketers Who Do not use E-Posse Machine