स्वच्छतेपाठोपाठ आता घरकुलाच्या सर्वेक्षणाला गुरुजी 

स्वच्छतेपाठोपाठ आता घरकुलाच्या सर्वेक्षणाला गुरुजी 

नांदगाव - २०१६-१७ व २०१७-२०१८ ची घरकुले पूर्ण होत असतानाच आगामी २०१८-१९ करता जिल्ह्यासाठी घरकुलांचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. त्यासाठी सध्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजने अंतर्गत घरकुलाच्या सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. त्यासाठी प्रगणक म्हणून प्राथमिक शिक्षकांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. 

येत्या ३० सप्टेंबरपर्यंत योजनेचा लाभ घेण्यासाठीचा सर्वेक्षणासाठीची मुदत याकामी देण्यात आलेली आहे त्यासाठी स्वच्छता अँप्स च्या धर्तीवर Awaas+ हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले. जिल्ह्यात या कामासाठी कुठेही प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या नसल्याच्या मुद्दयांवर मोठ्या संख्यने शिक्षकांच्या जागा रिक्त असलेल्या नांदगाव तालुक्यात अशा कामासाठी प्रगणक म्हणून नियुक्त्या करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

यापूर्वी दारिद्र्य रेषेच्या कामासाठीच्या सर्वेक्षणासाठी काम केलेल्या शिक्षकांना यादीत वंचित राहिलेल्या लाभार्थींच्या रोषाला समोर जावे लागल्याचा अनुभव असल्याने आत घरकुलाच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक म्हणून काम करण्यास शिक्षकांचा विरोध होताना दिसतोय निवडणूक व जनगणना वगळता इतर शिक्षण बाह्य कामे शिक्षकांवर सोपवू नये असे संकेत असतांना त्यांना विविध योजनांसाठी जुंपण्यात येत असल्याने शालेय गुणवत्तावर परिणाम होत असतो तरीही अशा नियुत्या होत आहेत  

जिल्ह्यातील सर्वेक्षणाची ताजी स्थिती 
कळवण-१९९१, मालेगाव-१८७४, सिन्नर-१८४४, येवला-१६५६, निफाड-१३९९, नाशिक-१००४, पेठ-९६८, नांदगाव-९०१, बागलान-९०२, चांदवड-७८६, देवळा-६९५, त्र्यम्बक-६९३, सुरगाणा-५९९, इगतपुरी-२१३, 

आतापर्यंत  जिल्ह्यात २५९ कोटी ९९ लक्ष रुपयांचे घरकुलाचे काम:- त्यात २०१६-१७ मध्ये २३७१० घरकुलांचे उद्दिष्ट होते त्यात  २०१७-१८ अखेर २१६६६ एवढेच काम पूर्ण होऊ शकले  

अशैक्षणिक कामे कागदोपत्री कमी झाले.राज्य संघटनांचा शासनावर वचक नाही.प्रत्यक्षात शाळाबाह्य कामे करावीच लागतात.परिणामी गुणवत्ता ढासळते. स्वतंत्र यंत्रणेकडे अशी कामं सोपवावी. - राजेंद्र दिघे शिक्षक नेते

प्रश्न सर्वेक्षणाच्या जबाबदारीचा नसून लाभार्थींची अंतिमतः निवड शासन करेल,मात्र अशा निवडीनंतर वंचित राहिलेल्या लाभार्थींच्या रोष शिक्षकांना पत्करावा लागतो असा पूर्वानुभव आहे त्यामुळे जिल्ह्यात कुठेही शिक्षकांना नियुक्त करण्यात आले नसताना रिक्त पदांच्या आवश्यकता असलेल्या क्षेत्रातील शिक्षकांना वेठीला धरले जाऊ नये :- राजेंद्र पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com