आता विजेची चिंता मिटली...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

देशातील सर्वच वीजकंपन्या एकाच ग्रीडला जोडल्या गेल्याने विजेबाबत चिंता मिटली असून, आपल्यातील अंतर कमी झाले आहे.

एकलहरे : देशातील सर्वच वीजकंपन्या एकाच ग्रीडला जोडल्या गेल्याने विजेबाबत चिंता मिटली असून, आपल्यातील अंतर कमी झाले आहे. त्याचप्रमाणे आपल्या कंपन्यांअंतर्गत होणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धांमधूनही देशभरात एकतेचा संदेश पोहचेल, असे प्रतिपादन 43 व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा व्हॉलीबॉल स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी संचालक संचलन चंद्रकांत थोटवे यांनी केले. 

43 व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या व्हॉलीबॉल स्पर्धा 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या एकलहरे येथील शक्तीमान क्रीडा संकुल येथे थोटवे यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, देशातील वीज उत्पादनात वाढ झाली असून, आवश्यकते नुसार कोणत्याही राज्याला वीजेची कमतरता पडली तर आता चिंता करायची गरज नाही, देशातील सर्वच वीज कंपन्या एकमेकांना एकाच ग्रीडला जोडल्या गेल्याने वीजेचे संकट दूर होण्यास मदत होणार  आहे. व्यासपीठावर कार्यकारी संचालक विनोद बोंदरे, मुख्य अभियंता उमाकांत निखारे, कार्याध्यक्ष नवनाथ शिंदे, राजेंद्र मिश्रा, जयंत विके, अनिल मुसळे, सहसंचालक डी.बी.डोंगरे, उपाध्यक्ष सुनील इंगळे आदी उपस्थित होते. 

विविध राज्यातील महानिर्मिती व महापारेषण व महावितरण या कंपन्यांतील 19 संघाचे व्यवस्थापकांचा यावेळी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोंदरे, राजेंद्र मिश्रा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पहिला सामना कर्नाटक व आंध्रप्रदेश यांच्यामध्ये खेळविण्यात आला.

औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे ,शंशाक कांबळे, लिना पाटील, पुरूषोत्तम कारजूकर, वासंती नाईक, निवृत्ती कोंडावले, व्यवस्थापन समितीचे आनंद भिंताडे, देवेंद्र माशाळकर, राकेश कमटमकर, संदीप कापसे, शशांक चव्हाण, मनोहर तायडे, राजेंद्र कुमावत, बाबासाहेब पाटील, सूर्यकांत वाघमारे, समीर देऊळकर, नंदने आदी उपस्थित होते.

स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी नागेश पद्मन, सुनिल सुळेकर, प्रभाकर रेवगडे, हरीश आहेर आदींसह समिती सदस्य परिश्रम घेत आहेत.

1) कर्नाटक पाॅवर ट्रान्स्मिशन(२-०) ने विजयी विरुद्ध आंध्रप्रदेश 

२) उत्तर प्रदेश पाॅवर विरुद्ध हिमाचल प्रदेश(२-१)

३) महाडीस्काॅम(२-०) विरुद्ध मध्य प्रदेश पाॅवर

४) महापारेषण विरुद्ध उत्तराखंड पाॅवर स्पोर्टस (२-०)

५) केरळ (२-०) विरुद्ध भाक्रा नांगल

६) कलकत्ता इले. बोर्ड(२-०) विरुद्ध कर्नाटक पाॅवर काॅ. लि.

७) पंजाब (२-१) विरुद्ध तेलंगणा राज्य पारेषण

८) तामिळनाडू (२-०) विरुद्ध छत्तीसगड

९) कर्नाटक पाॅवर ट्रान्समिशन(२-०) विरुद्ध उत्तर प्रदेश पाॅवर काॅ.लि.

१०) आंध्रप्रदेश इले. काॅ.(२-०) विरुद्ध हिमाचल प्रदेश.

Web Title: Now the Problems of Electricity has been Solved says Chandrakant Thotave