अणुशक्तीचा वापर शांततेसाठीच हवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

नाशिक : दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने अणुबॉंबचा वापर जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर केला होता. आज या घटनेला अनेक वर्ष उलटून गेले; पण त्यांची दाहकता आजही पाहायला मिळत आहे. आज प्रत्येक विकसन आणि विकसित राष्ट्र अणुशक्‍ती संपन्न होण्यासाठी प्रयत्न करत आहे; मात्र, अणुशक्तीचा वापर हा शांततेसाठीच व्हायला हवा, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी व्यक्त केले.

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच. पी. टी. तसेच एस. एम. आर. के. महिला महाविद्यालयातर्फे सुरू असलेल्या 19 व्या जागतिक शांतता परिषदेत आज त्यांनी "शांतता शिक्षणासांठी युवकांचा संपूर्ण विकास' (पीस एज्युकेशन फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ युथ) या विषयावर संवाद साधला. व्यासपीठावर गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर उपस्थित होते.

राष्ट्राच्या संरक्षणासाठी अनेक देश एकाहून एक अधिक शक्तिशाली आण्विक शस्त्रे बनवत आहेत. इतर राष्ट्रासाठी हे धोक्‍याचे लक्षण आहे; पण प्रगत राष्ट्रांनी मात्र या शक्तीचा वापर विध्वंसासाठी न होता, त्यातील घटकांपासून शांतता प्रस्थापित करण्यासाठी कसा केला जाईल हे पाहावे, असे नमूद करून गोवारीकर म्हणाले, आज दहशतवाद मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. धार्मिकतेच्या माध्यमातून दहशतवादी युद्ध पुकारत आहेत. त्यामुळे हे तिसऱ्या महायुद्धाचे कारणही ठरू शकते. जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघातर्फे अण्वस्त्रमुक्त जग करण्याच्या दृष्टीने पावलेदेखील उचलत प्रयत्न केले; मात्र, त्यास अनेक राष्ट्रांनी सुरक्षिततेचे कारण दाखवल्याने अपयश आले. त्यामुळे अशा प्रकारच्या शांतता परिषदेच्या माध्यमातून युवा पिढीने शांतता टिकविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

Web Title: Nuclear power should be used for peace, says Shankar Gowarikar