शिष्यवृती परीक्षेची विद्यार्थी संख्या ५० टक्क्यांनी घटली

खंडू मोरे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नाशिक - महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नोंदणी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी, विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षण विभागास अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे.

नाशिक - महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नोंदणी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी, विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षण विभागास अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे.

पाचवी आणि आठवीसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी होणार आहे. यासाठी अर्ज करण्याकरिता १९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला होता.परंतु दिवाळीच्या सुट्या आणि विध्यार्थ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु, मुदवाढ दिली असली तरी विद्यार्थी नोंदणी संख्या ही निम्म्याने घटल्याने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त होत आहे.

चौथ्या व सातव्या वर्गासाठी परीक्षा असतांना व मध्यंतरी काही वर्ष शिष्यवृती परीक्षेची चौथीच्या सर्व विद्यार्थीना सक्ती करण्यात आली होती. २०१७ पासुन ही परिक्षा पाचवी आणि आठवीसाठी करण्यात आली. या नियमाचा देखील परिणाम परीक्षा अर्ज नोंदणीवर दिसून येत आहे.

पूर्वी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थी व ७वी च्या वर्गासाठी होती. आता २०१७ पासून ५ वी व ८ वीच्या वर्गासाठी आहे. ५ वी ते ८ वीचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा कमी झाल्याने मोठ्या संख्येने शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसणारे विध्यार्थी संख्या नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात देखील रोडावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

२०१८ च्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २४ हजार ६४४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यावर्षी ही संख्या २० हजार ४५३ एवढी घसरली आहे, तर आठवीसाठी २०१८ मध्ये १८ हजार ९६० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यावर्षी ही संख्या १४ हजार ७७८ एवढीच नोंदणी झाली आहे. परीक्षा परिषदेने मुदत वाढ देऊनही विद्यार्थ्यांची अनास्था असल्याचे चित्र आहे.

नाशिक जिल्ह्यातील मागील पाच वर्ष्यातील शिष्यवृती परीक्षेची विद्यार्थी
 २०१५ - इयता ४ थी-  ७६५११ इयता ७ वी – ३४८२३
 २०१६ - इयता ४ थी- ४८५२१ इयता ७ वी - २९६५३  
 २०१७ - इयता ४ थी- २७२७९ इयता ७ वी -२११५७
 २०१८ - इयता ५ वी – २४६४४ इयता ८ वी -१८९६०
 २०१९ - इयता ५ वी – २०४५३ इयता ८ वी- १४७७८

जिल्हा परिषद शाळांचे इ.५वी व इ.८ वीचे वर्ग कमी आहेत. खाजगी व्यवस्थापनेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला तुलनेने कमी बसतात. त्यामुळे परीक्षार्थी संख्या कमी होत आहे. पुढील काळात जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेला बसतील यासाठी शाळांना आवाहन करण्यात येणार आहे.
- प्रमोद चिंचोले, शिक्षण विस्तार अधिकारी, समन्वयक शिष्यवृत्ती परीक्षा.

पूर्वी शिष्यवृती परीक्षेसाठी निवडक विध्यार्थी परीक्षार्थी असत प्राथमिक शाळांमध्ये सक्तीने विद्यार्थी बसवण्याचा नियम झाल्यानंतर व ह्या परीक्षा वरच्या वर्गांना केल्याने परीक्षे संदर्भात गांभिर्य कमी होत परीक्षार्थी रोडावले आहेत.
- चंद्रकांत महाजन, प्राथमिक शिक्षक.

Web Title: The number students of scholarships to be reduced by 50 percent