नायलॉन मांजाने कापला आणखी एकाचा गळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

सिन्नर - नायलॉन मांजामुळे अवघ्या तेरा दिवसांपूर्वी एका युवकाचा गळा कापल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (ता. 26) दुचाकीवरून जाणाऱ्या गणेश कोठुरकर (वय 32) या युवकाचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला. या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक पालक आपल्या चिमुकल्यांना घराबाहेर पाठवण्यास घाबरत असल्याचे चित्र आहे.

बुधवारी गणेश हा दुपारी दोनच्या सुमारास तहसील कचेरीच्या रोडने आपल्या चौदा चौक वाड्यात असलेल्या प्रिंटिंग प्रेसवर जात असताना अचानक गळ्यावर आलेल्या नायलॉन मांजामुळे त्याचा गळा कापला गेला. सुदैवाने जखम जास्त खोलवर नसल्याने थोडक्‍यात निभावले.
दरम्यान, 13 डिसेंबर रोजी बसस्थानकाजवळ उमाकांत ऊर्फ दिलीप नवले या युवकाचा गळा नायलॉन मांजामुळे खोलवर कापल्या गेल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. दैव बलवत्तर म्हणून तातडीने त्याच्यावर उपचार झाल्यामुळे त्याचे प्राण वाचले होते. त्याच्या गळ्याची एक रक्तवाहिनी कापली गेली होती. गळ्याच्या जखमेवर उपचार करताना 65 टाके टाकण्यात आले होते.

कारवाई न केल्यास उपोषण
जखमी गणेश याने सिन्नर नगर परिषदेकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्यात म्हटले आहे, की नायलॉन मांजामुळे माझ्या गळ्याला जखम झाली असून, अशा प्रकारच्या मांजा विकणाऱ्यांना व्यक्तींवर पालिकेने तातडीने कारवाई करावी अन्यथा नगर परिषदेसमोर उपोषणास बसेल.

Web Title: Nylon cut off the neck of another one