अश्‍लील संदेश प्रकरणी "आरटीआय' कार्यकर्त्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

जळगाव - मुंबईतील महिला आमदाराला अश्‍लील संदेश पाठविल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ताला मंगळवारी सकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली. दुपारी पोलिस पथक संशयितासह रेल्वेतच असतानाच इतक्‍यात नाशिकच्या महिला आमदाराच्या तक्रारीची दखल घेत नाशिक पोलिस जळगावी पोचले. मात्र, त्याला मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे कळाल्यावर नाशिक पोलिस माघारी परतले. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या तपासानंतर नाशिक पोलिस गुप्ताला चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळाली. 

शिवाजीनगर भागातील माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांच्या मोबाईलद्वारे विलेपार्ले परिसरातील महिला आमदाराला 22 फेब्रुवारीला मोबाईलवरून अश्‍लील संदेश गेला होता. या प्रकरणी मुंबईच्या विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होऊन गुप्ता याच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. मंगळवारी विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने मंगळवारी गुप्ता यास शिवाजीनगर येथील घरातून ताब्यात घेत दुपारी तीन वाजताच कामायनी एक्‍स्प्रेसने हे पथक संशयितासह मुंबईकडे निघाले.

Web Title: Obscene messages case