PHOTOS : अगडदुम नगारा...सोन्याची जेजुरी...प्रतिजेजुरी गडावर सदानंदाचा येळकोट...

राम खुर्दळ : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

चंपाषष्ठीनिमित्त यंदा सवाद्य भांडाऱ्याची मनमुक्त उधळण करून, पंचक्रोशीतील गावकरी भक्तांनी पिवळे फेटे परिधान करून, नृत्य करणारे घोडे, उंट, नंदीबैल, देवाचा रथ, यांच्यासह आदिवासी नृत्य, विविध कला सादर करीत गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील कित्येक भक्तांनी मिरवणुकीचे दर्शन घेतले.

नाशिक : चंपाषष्ठीनिमित्त शेकडो वर्षे अविरत चाललेल्या नाशिकमधील गिरणारे गावातील अतिप्राचीन ग्रामदैवत, कुलदैवत असलेल्या खंडेराव महाराज देवस्थान (ज्याला प्रतिजेजुरी असेही म्हणतात). या देवस्थांनची यात्रा विविध धार्मिक परंपरागत उपक्रमात, उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

Image may contain: one or more people, people on stage, child and outdoor

या उत्सवानिमित्त यावर्षी सवाद्य भांडाऱ्याची मनमुक्त उधळण करून, पंचक्रोशीतील गावकरी भक्तांनी पिवळे फेटे परिधान करून, नृत्य करणारे घोडे, उंट, नंदीबैल, देवाचा रथ, यांच्यासह आदिवासी नृत्य, विविध कला सादर करीत गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील कित्येक भक्तांनी मिरवणुकीचे दर्शन घेतले,

Image may contain: one or more people, people standing, crowd and outdoor

भरीत-भाकरीच्या नैवेद्याची गोडीच भारी..
या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यात महिला, मुलींनी डोक्यावर तुळशी कलश घेतले होते, रस्त्या रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती, या मिरवणुकीत आधुनिक वाद्य, त्यासोबत सनई, चौघडा, वाजंत्री असेही वाद्य होते. त्यानंतर इगतपुरी येथील जोगमहाराज भजनी मठाचे मठाधिपती हभप.माधव महाराज घुले यांचे कीर्तन, महाप्रसाद, तत्पूर्वी पूर्वसंध्येला गोंधळ, जागर व सायंकाळी प्राचीन बांधणी असलेल्या खंडेराव गडावर यात्रा भरली. यात भरीत भाकरीचा नैवेद्य तसेच घराघरात तळी भरून चंपाषष्ठी उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. एकूणच गिरणारेसह परिसरातील असंख्य नागरिक भक्त या उत्सवाचा आनंद घेत होते,

Image may contain: one or more people, people standing and outdoor

चंपाषष्ठीनिमित्त गिरणारेच्या प्रतिजेजुरीवर भक्तांची गर्दी

दक्षिणेस गिरीपर्वती खंडेरावांचे अतिप्राचीन बांधणीचे दगडी मंदिर 
गिरणारेच्या दक्षिणेस गिरीपर्वती खंडेराव महाराजांचे गडावर अतिप्राचीन बांधणीचे दगडी मंदिर आहे,समोर दगडी दीपमाळ,भुयारी मार्ग,प्रशस्त हॉल,मंदिरास रोषणाई असा गड चंपाशस्टी उत्सवानिमित्त सजला होता.

Image may contain: 2 people, people standing

गिरणारेतील थेटे कुटुंबियांचे कुलदैवत,गाव पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबारायाची मोठ्या प्रमाणात यात्रात्सव गिरणारेत झाला.अख्ख्या गावाने सहभाग घेऊन या उत्सवातील आनंद घेतला.एकूणच दरवर्षीप्रमाणे अधिकाधिक उत्सवी बनणारा हा उत्सव अधिक भक्तिभावाने गाव साजरा करीत आहेत.या उत्सवातील नागरिकांचा सहभाग व मिरवणुकीतील एकूण विविध सांस्कृतिक कला दर्शन,भक्तीभावात हा उत्सव गिरणारेकरांच्या आनंदाला उधाण आणणारा भक्ती सोहोळा दिवसागणिक वाढतो आहे.या उत्सवात जिल्हाभरातून भाविक भक्त दर्शनास आले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Occasion of Champashashthi Various activities at the fort of Girnare Nashik Marathi News