"बॅचलर पार्टी'तील मुले अधिकाऱ्यांची; पोलिसांचे मौन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

नाशिक - इगतपुरी येथील मिस्टिका व्हॅली हॉटेल परिसरातील बंगल्यामधील "बॅचलर पार्टी'मध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मुले बारबालांवर पैसे उधळताना रविवारी (ता. 26) सापडली. या घटनेतील संशयितांची जामिनावर सुटका झालेली असली तरी बारबाला वगळता सापडलेली मुले ही सार्वजनिक बांधकाम, पोलिस व प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची मुले असल्याची चर्चा आहे. मात्र, ग्रामीण पोलिसांकडून हा प्रकार सुरवातीपासूनच दडविला जात असल्याने या प्रकरणाबाबतच संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. 

इगतपुरी परिसरातील तळेगाव शिवारात मिस्टिका व्हॅली हॉटेलमधील एका बंगल्यामध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बॅचलर पार्टी सुरू होती. डीजेच्या तालावर बारबाला नाचविल्या जात होत्या आणि त्यांच्यावर नाशिक, मुंबई, पुण्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मुले मद्याच्या नशेमध्ये पैसे उधळत होते. ही माहिती मिळताच इगतपुरी पोलिसांनी याठिकाणी छापा घालून पाच बारबाला व आठ मुलांना ताब्यात घेतले होते. यातील सहा मुले उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यांची असल्याची चर्चा आहे. 

गुन्ह्याची नोंद झालेल्यांमध्ये नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागात असलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या व पुण्याच्या प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच्या मुलाचा समावेश आहे. याचप्रमाणे, नाशिक पोलिस परिक्षेत्राचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक यांचा जावईही या पार्टीमध्ये असल्याची चर्चा आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मुले या पार्टीत असल्याने त्यांच्याकडून पोलिसांवर दबाव आल्याचीही चर्चा आहे. 

पोलिस अधीक्षकांकडून नकारघंटा 
या संदर्भात नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, ही मुले कोणा अधिकाऱ्याची आहेत हे ठाऊक नसल्याचे सांगत थेट उत्तर देणे टाळले. नेहमी अशा पार्ट्यांमधून ताब्यात घेतलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले जाते वा त्यांचा पत्ता घेऊन पोलिसांकडून माहिती दिली जाते; परंतु या प्रकरणात पोलिसांकडून सुरवातीपासूनच माहिती दडविली जात असल्याने याप्रकरणी संशयाचे वातावरण आहे. 

Web Title: officer children in Bachelor Party