कामाच्या ताणामुळे अधिकाऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नाशिक - नाशिक महापालिकेतील घरपट्टी विभागातील सहायक अधीक्षक संजय दादा धारणकर (44, रा. गंगापूर रोड) या अधिकाऱ्याने कामाच्या अतिरिक्त ताणामुळे गुरुवारी घरी गळफास लावून आत्महत्या धारणकर गेल्या 22 वर्षांपासून महापालिकेत कार्यरत होते. या घटनेमुळे प्रशासनाची कामकाज पद्धती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. 

धारणकर यांनी आज दुपारी राहत्या घरात गळफास लावून घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, त्यात "कामाच्या ताणामुळे आत्महत्या करत आहे. मुलांचा सांभाळ करा', असा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. धारकर यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दीर्घरजेवर होते. बुधवारी (ता.1) ते कामावर हजर झाले होते. 

Web Title: Officers suicide due to work stress