...अन् आजीबाई थोडक्यात बचावल्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

मनमाड : दैव बलवत्तर म्हणून समोरून धडधडत येणारा काळ अगदी जवळून निघून गेला आणि आजीबाईच्या जीवात जीव आला. मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे क्रॉसिंगच्या नादात समोरून भरधाव वेगात आलेल्या गीतांजली एक्सप्रेसच्या खाली जाताजाता अगदी थोडल्यात वाचल्या.

मनमाड : दैव बलवत्तर म्हणून समोरून धडधडत येणारा काळ अगदी जवळून निघून गेला आणि आजीबाईच्या जीवात जीव आला. मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे क्रॉसिंगच्या नादात समोरून भरधाव वेगात आलेल्या गीतांजली एक्सप्रेसच्या खाली जाताजाता अगदी थोडल्यात वाचल्या.

येथून जवळ असलेल्या भालूर येथील सुमनबाई गंगाधर धनगे ही वृद्ध महिला आज निजामुद्दीन-गोवा एक्सप्रेसने जळगाव येथून मनमाड रेल्वे स्थानकावर फलाट क्र 4 वर उतरली. मात्र, ही वृद्धा स्थानकाबाहेर जाण्यासाठी पादचारी पुलावरून जाण्याऐवजी फलाट क्र 4 वरून चालत तीनवर आली आणि तेथून फलाट क्र. 2 वर जाण्यासाठी फलाटावरून रेल्वेलाईनवर खाली उतरली. रेल्वे लाईनवर उतरताना तिच्या जवळील असलेले ओझे एका प्रवाशाने तिच्या हाती देण्यासाठी मदत केली. मात्र रेल्वेलाईन क्रॉस करण्याच्या प्रयत्नात असताना लाईनजवळ जाणार तेवढ्यात फलाट क्र दोनच्या लाईनवरून मुंबईकडून भुसावळकडे जाणारी गीतांजली एक्सप्रेस भरधाव वेगात आली आणि आजीबाई बाजूला फेकली गेली.

गीतांजली एक्सप्रेस ही मनमाडला थांबत नसल्याने अतिवेगात धडधडत गाडी स्थानक पार करून गेली. मात्र समोरून धडधडत येणारा काळ अगदी खेटून गेला. केवळ दैव बलवत्तर म्हणून आजीबाई वाचली, ही बाब लक्षात येताच फलाट क्र तीनवर असलेले रेसूब कर्मचारी संतोष जायभाय यांनी तातडीने  लाईनवर उतरून या वृद्ध महिलेला उचलले साक्षात मृत्यूसमोर आलेला होता. मात्र मृत्यूवेळ आलेली नव्हती. अगदी जवळून धडधडत गेलेल्या गीतांजलीमुळे आजीबाई खूपच भेदरली होती. या महिलेला रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात नेण्यात आले. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक के. डी. मोरे व इतर कर्मचाऱ्यांनी या वृद्ध महिलेची विचारपूस केली.
 

Web Title: Old age women rescused from rail