रस्त्यावरील अती जिर्ण झाडे ठरताहेत जिवघेणी

राज्य महामार्गालगत कोरडे झालेले झाड रस्त्यावरील
राज्य महामार्गालगत कोरडे झालेले झाड रस्त्यावरील esakal

कापडणे (जि. धुळे) : धुळे जिल्ह्यातून चार राष्ट्रीय महामार्ग आणि सहा राज्यमार्ग जातात. या महामार्गाच्या कडेला वृक्षारोपण करण्याचा उपक्रम दर वर्षीच राबविला जातो. त्याचबरोबर जीर्ण झाडे व कोरडी झालेली झाडे काढणेही खूप गरजेचे आहे. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसाने ही झाडे उन्मळून पडतात. त्यांच्या फांद्याही मोडतात. त्यामुळे प्रवाशांसह वाहनांचेही नुकसान होते. जीर्ण झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी काढावीत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

रस्त्यांच्या दुतर्फा कोरडी झाडी
रस्त्याच्या दुतर्फा जीर्ण आणि जर्जर झाडांसह कोरड्या झालेल्या झाडांची संख्याही अधिक आहे. ही झाडे काढणेही आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही झाडे काढावीत, अन्यथा येत्या पावसाळ्यात ही झाडे पडल्यास होणाऱ्या नुकसानीस आपल्यालाच जबाबदार राहावे लागणार आहे. जिल्हाभरातून जीर्ण झाडे काढण्याची मागणी जोर धरत आहे.

कापडणेत एक जखमी
येथील कौठळ रस्त्यावर झाड कोसळल्याने शेतकरी पंकज पाटील जबर जखमी झाला. कुटुंबासह दुचाकीवरून जात होते.त्या वेळी झाड कोसळले.

राज्य महामार्गालगत कोरडे झालेले झाड रस्त्यावरील
...या प्रकल्पामुळे धुळ्याचे नावलौकिक सातासमुद्रापार जाणार

बांधाला लावू नका आग
पावसाळ्यापूर्वी बरेचसे शेतकरी नालाकाठावरील व बांधावरील घाण काढतात. त्यासाठी तो काट्याकुट्यांचा काडीकचरा पेटवून देतात. त्यामुळेही मोठी झाडे अचानक उन्मळून पडण्याच्या घटना घडतात. शेतकऱ्यांनी हा कचरा न जाळण्याचे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

राज्य महामार्गालगत कोरडे झालेले झाड रस्त्यावरील
वाळूसह खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर GPS बंधनकारक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com