Dhule Crime News : मारहाणीतील वृद्धाचे निधन; निजामपूर पोलिसांत 10 जणांवर खुनाचा गुन्हा | Old man dies in beating Murder case against 10 people in Nizampur police Dhule Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Dhule Crime News : मारहाणीतील वृद्धाचे निधन; निजामपूर पोलिसांत 10 जणांवर खुनाचा गुन्हा

Dhule Crime News : म्हसाळे (ता. साक्री) शिवारात रुदाणेतील वृद्धास बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेतील वृद्धाला उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारावेळी त्याचे निधन झाले. त्यामुळे मारहाण करणाऱ्यांवर वाढीव कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. (Old man dies in beating Murder case against 10 people in Nizampur police Dhule Crime News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नानाभाऊ बाबू भिल (वय ६२, रा. रुदाणे, ता. शिंदखेडा) असे मृत वृद्धाचे नाव आहे. तत्पूर्वी, या वृद्धाने नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलिस ठाण्यात बापू काशीनाथ भिल याच्याविरुद्ध फिर्याद दिली. या कारणावरून नानाभाऊ भिल या वृद्धास ७ मेस सायंकाळी साडेसहाच्या सुमारास म्हसाळे शिवारातील अमोदे फाट्याजवळ बापू भिल याने कुऱ्हाडीने डोक्यात वार केला.

नाना महादू भिल, सुकराम पुंडलिक भिल, राजू नाना भिल, सोनू भाया भिल, गणेश भाया भिल, बहिरम नाना भिल, दशरथ नारायण भिल, ज्ञानेश्वर पावबा भिल व जिभाऊ काशीराम भिल यांनी शिवीगाळ करीत लाठ्याकाठ्या, हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

गंभीर जखमी अवस्थेत नानाभाऊ भिल यांचा ८ मेस जिल्हा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांना मारहाण करणाऱ्या संशयित दहा जणांवर वाढीव कलमानुसार निजामपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.