वृद्धाकडून मुलीचा विनयभंग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) : वयाची सत्तरी पार केल्याल्या वृध्दाने एका बारा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (ता.16) कळमडु (ता. चाळीसगाव) येथे घडली. संशयितास मेहुणबारे पोलीसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, भीमराव नामदेव पाटील (वय 78) याची घरगुती चक्की आहे. त्याच्या चक्कीवर त्याच्या घराजवळच असलेल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीची आजी दळण ठेवुन घरी आली.

थोड्यावेळाने आजीने आपल्या नातीला चक्कीवर दळण घेण्यासाठी पाठविले तेव्हा सायंकाळी साडेपाचची वेळ होती. त्यावेळी चक्कीवर असलेल्या संशयीत भिमराव पाटील यांने त्या बालिकेशी अंगलट करून एकटी असल्याचा फायदा घेत व तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या कृत्याने ती बालिका भयभीत होऊन घरी आली. 

भयभीत झालेली बालिका घरी दळण घेऊन आल्यावर एकदम भेदरलेल्या अवस्थेत होती. मात्र  तिने घडलेला प्रकार आपल्या आजीला सांगितला. त्यामुळे तेथे एकच खळबळ उडाली. मुलीला घेऊन सदर कुटंबियांनी मेहुणबारे पोलिस ठाणे गाठले व पोलिसांसमोर त्या मुलीने सर्व घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात संशयित भिमराव पाटील याच्या विरोधात विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार कलम 8 अ प्रमाणे फोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हेमंत शिंदे हे करीत आहे.संशयीत आरोपीस जळगाव येथे विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते.त्यास कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांनी 'सकाळ' शी बोलतांना सांगितली.

जैसा बाप वैसा बेटा
कळमडु येथील भिमराव पाटील यांची जसी विकृती तशीच मुलाचीही आहे. मुलगा भाईदास पाटील याने देखील काही वर्षापुर्वी एका महिलेचा विनयभंग करून तिला अत्महत्येस प्रवृत्त केले होते. त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल आहे, म्हणून जैसा बाप वैसा बेटा याचे हे उदाहरण आहे.

Web Title: old man Molest a girl in chalisgao