बसथांब्यावर वृद्धाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

सुरेश धाकड यांनी आज (ता.९) सकाळी नऊला महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराना, आढे गावच्या बसथांब्यावर लोखंडी अँगलला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. लोकांनी टोल नाक्यावरील सुरक्षा रक्षकाला याबाबत माहिती दिली. माहिती कळताच घटनास्थळी गर्दी जमली. त्यातील बघ्यांनी सुरेश धाकड यांची ओळख पटवली. मृतदेहाच्या पायाजवळ वहीच्या पानावर चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात जीवाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, खिशात साडेचार हजार रुपये आहेत असा उल्लेख आहे

 

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर टोल नाक्याजवळील बस थांब्यावर आज (ता.९) सकाळी वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केली. सुरेश भीमराज धाकड (७५, रा.शिरपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

जीवाला कंटाळून आत्महत्या करतोय, खिशात साडेचार हजार रुपये आहेत..

 शिरपूरध्ये आयुर्वेदिक औषधी विक्रीचा व्यवसाय असलेल्या सुरेश धाकड यांनी आज (ता.९) सकाळी नऊला महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराना, आढे गावच्या बसथांब्यावर लोखंडी अँगलला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. लोकांनी टोल नाक्यावरील सुरक्षा रक्षकाला याबाबत माहिती दिली. माहिती कळताच घटनास्थळी गर्दी जमली. त्यातील बघ्यांनी सुरेश धाकड यांची ओळख पटवली. मृतदेहाच्या पायाजवळ वहीच्या पानावर चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात जीवाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, खिशात साडेचार हजार रुपये आहेत असा उल्लेख आहे. बिस्किटाचा पुडा, टॉवेल, लहान झाडू अशा वस्तूही पडल्या होत्या. मृत धाकड यांचा मोबाईल गळ्यात लटकवला होता. 
येथील मर्चंट बँकेसमोर धाकड यांचे आयुर्वेदिक औषध विक्रीचे दुकान आहे. धुळे येथेही त्यांनी काही वर्षांपूर्वीं औषध विक्रीचा व्यवसाय थाटला होता. आज सकाळी ते घरातून बाहेर पडले. नेहमीच बाहेर जात असल्यामुळे आपल्याला ते असे टोकाचे पाऊल उचलतील याची कल्पना आली नाही असे त्यांच्या मुलाने सांगितले. थाळनेर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old man suicides at shirpur bus stop