जुन्या पाचशेच्या नोटांना आज "गुडबाय'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

नाशिक - नोटाबंदीच्या निर्णयानंतर विविध शासकीय आस्थापनांसह अन्य आवश्‍यक ठिकाणी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याठी देण्यात आलेली मुदत उद्या (ता. 15) संपणार आहे. त्यानंतर सरकारी रुग्णालयासह विमानतळ, मेडिकल आदी ठिकाणी पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. या नोटा फक्‍त बॅंकेत जमा करता येणार आहेत.

पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काही ठराविक ठिकाणी नोटा स्वीकारण्याची अनुमती देण्यात आली होती. 24 नोव्हेंबरपासून एक हजार रुपयांच्या नोटा फक्‍त बॅंकेतच जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पाचशे रुपयांच्या नोटांसाठी मात्र सवलत देण्यात आली होती. यासाठी दिलेली मुदत उद्या संपत आहे. त्यानंतर पाचशे रुपयांच्या नोटाही फक्‍त बॅंकांमध्येच जमा करता येतील. डिसेंबरअखेरपर्यंत पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा जमा करणे शक्‍य न झाल्यास 31 मार्च 2017 पर्यंत प्रतिज्ञापत्रासह आरबीआयकडे या नोटा जमा करता येणार आहेत.

दरम्यान, दैनंदिन खर्चासाठी लागणारी रोकड मिळविण्यासाठी सर्वसामान्यांकडून बॅंकांमध्ये चकरा मारण्याचे काम नित्याचे बनत चालले आहे. यामुळे ठराविक ठिकाणच्या बॅंकांच्या शाखा व कार्यरत असलेल्या एटीएमच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. अनेक बॅंकांना अद्यापही आपले एटीएम कार्यरत करण्यात यश आलेले नाही.

उद्यापासून या ठिकाणी चालणार नाहीत जुन्या पाचशेच्या नोटा
-प्रीपेड मोबाईल शॉप
-पाणीबिल, वीजबिल
-शासकीय रुग्णालये
-एलपीजी सिलिंडर
-मेडिकल
-स्मशानभूमी
-सरकारी बियाणे केंद्र
-दूध केंद्र
-विमानतळ
-अनुदानित शाळा-महाविद्यालये
-ग्राहक सहकारी भांडार
-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा

Web Title: old notes five hundred Goodbye