ज्येष्ठांना तीर्थवारी घडविणारा ‘श्रावणबाळ’

अमोल भट
मंगळवार, 15 जानेवारी 2019

जळगाव - आयुष्यभर राब-राब राबून जीवनाच्या संधिकाळात धार्मिक स्थळांची तीर्थयात्रा करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र काबाडकष्ट करून हाता-तोंडाच्या लढाईत आयुष्य गेलेल्या   ज्येष्ठांच्या इच्छेत पैशांचा अडसर जाणवतो. अशांसाठी नांद्रा (ता. पाचोरा) येथील विश्‍वंभर भिका सूर्यवंशी (बापूसर) हे आधुनिक ‘श्रावणबाळ’ बनले आहेत.२०१२ पासून दरवर्षी परिसरातील शेकडो ज्येष्ठांना त्यांनी मोफत तीर्थयात्रा घडवून आणल्या आहेत. 

जळगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या बापू सरांना पर्यटन आणि तीर्थयात्रेची आवड असल्याने कष्टकरी कुटुंबातील वयोवृद्धांसाठी तीर्थवारीचा वसा घेतला. बालाजी ग्रुपच्या माध्यमातून नांद्रा परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील ज्येष्ठांना मोफत आणि अन्य ज्येष्ठांना माफक दरात चारधाम यात्रा घडविली आहे. आपल्या मित्र परिवाराच्या आई-वडिलांना तीर्थयात्रेची सेवा घडवली. परंतु, स्वतःच्या आई-वडिलांना तीर्थयात्रा घडवू न शकल्याचे शल्य असल्याचे सांगताना त्यांचे डोळे पाणावतात. या कार्यात बापूसरांना पत्नी हेमलता सूर्यवंशी यांची साथ मिळते.

दार्जिलिंग, हिमाचल प्रदेशला यंदा भेटी देण्याचा मानस आहे. आजपर्यंत ज्या यात्रेचे आयोजन करण्यात आले, त्या निर्विघ्न पणे संपन्न झाल्या याचे समाधान आहे. 
- विश्‍वंभर सूर्यवंशी

Web Title: Old People Pilgrimage Vishwambhar Suryavanshi Motivation Social Work