Revenue Department News : अवैध वाळूउपसा करणाऱ्यावर न्याहळोद येथे महसूलची कारवाई | On illegal sand mining Proceedings of Revenue at Nyahlod Dhule News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Revenue-Department Work News

Revenue Department News : अवैध वाळूउपसा करणाऱ्यावर न्याहळोद येथे महसूलची कारवाई

Dhule News : येथील पांझरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोलरो पिक-अप वाहनावर मंडळ अधिकारी सी. यू पाटील व त्यांच्या पथकाने कारवाई करून धुळे तहसीलला वाहन पुढील कारवाईसाठी जमा केले.

अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाने या महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई केली आहे, तरीदेखील वाळू तस्कर महसूल विभागाच्या कारवाईला जुमानत नाहीत, असे चित्र पाहायला मिळत आहे. ( On illegal sand mining Proceedings of Revenue at Nyahlod Dhule News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पांझरा नदीपात्रातून विश्वनाथ सुकवड रस्त्याजवळ बोलेरो पिक-अप गाडीतून अवैध वाळू उपसा सुरू असताना नगाव मंडळ अधिकारी सी. यू. पाटील, न्याहळोद तलाठी सी. जे. चंदेल, नगाव तलाठी सी. एम. पाटील, जापी तलाठी महाजन, रामी तलाठी बी. टी. पाटील, बी. पी. ठाकरे, कोतवाल भरत कोळी, माजी उपसरपंच प्रकाश वाघ आदींच्या पथकाने कारवाई करत वाहन जमा केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पांझरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला असतानादेखील वाळू तस्कर वाळू उपसा बंद करण्यास तयार नाहीत. काही दिवसांपूर्वी पांझरा नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्यांवर सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते तरीदेखील अवैध वाळूउपसा सुरूच आहे.