महिलेच्या खूनप्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

तीस घाटातील मृतदेहाजवळ नेले असता खात्री पटताच गुन्हेगाराच्या शोधार्थ तपासचक्र वेगाने फिरविण्यास सुरवात केली. मात्र, कोणीही काही सांगत नव्हते. यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. कोणीही पुढे येत नव्हते.

घोटी : नाशिक नगर सीमारेषेवर बारीघाटातील ( ता. 13 ) रोजी जंगलात अज्ञात महिलेचा मृतदेहाचा घोटी पोलिसांनी अवघ्या आठ तासात छडा लावत संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्याने पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

बारीघाटात अज्ञात महिलेच्या कुजलेल्या मृतदेहाने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मीडियातून जिल्हाभर पसरल्याने पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे ठाकले असता ग्रामीण पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलिस उपधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी तातडीने पोलिसांची दोन पथके तयार करत गुन्ह्याच्या शोधार्थ धाडली.

मृतदेहाजवळ पडलेल्या जेवणाचा स्टील डब्बा, कपडेसोबत घेत काही मोजक्या कर्मचा-यांसोबत परिसरातील गाव, वस्त्या वाड्या भर पावसात पिंजण्यास सुरवात केली. नागरिकांशी चर्चा करीत साहित्य दाखवत होते. भोईरवाडी येथील महिला आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याचे खबऱ्याने सांगताच मोर्चा सदर महिलेच्या घराकडे वळवत मृतदेहाच्या जवळील साहित्य दाखवतच मुलगी आश्विनीने (वय-15) हंबरडा फोडत माझी आई शोभा शिवाजी शिंदेचे (वय-40) असल्याचे सांगितले.

तीस घाटातील मृतदेहाजवळ नेले असता खात्री पटताच गुन्हेगाराच्या शोधार्थ तपासचक्र वेगाने फिरविण्यास सुरवात केली. मात्र, कोणीही काही सांगत नव्हते. यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. कोणीही पुढे येत नव्हते. यातच सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी काही निवडक नागरिकांना बाजूला घेत शोभाला कोणाच्या बरोबर जाताना  पहिले का ? यावेळी गावातील नागरिकांनी शिवाजी मंगळू भोईर याच्या गाडीवर जाताना पाहिल्याचे सांगताच शिवाजी भोईर यांच्या घराकडे पोलिसांनी मोर्चा वळवला असता तो पळून जात असल्याचे पोलिसांना दिसताच काही अंतरावर पाटलाग करून त्याच्या मुसक्या आवळून पोलिस ठाण्यात आणले.

मात्र, मला माहित नाही, माझा संबंध नसताना मला अटक करू शकत नाही, अशी बेजाबदार व संशयित उत्तरे देण्यास सुरवात केली. मात्र, संशयाची सुई शिवाजी ह्याकडेच असल्याने शेवटी पोलिसीखाक्या दाखवताच पोपटावाणी बोलण्यास सुरवात केली. शोभाचे आमचे अनेक वर्षांपासून अनैतिक सबंध होते. शारीरिक संबंधास नकार तर कधीकधी ती सोबत येण्यास टाळत होती. याच रागातून तिचा कायमचा काटा काढण्यासाठी तिला बारीयेथील घाटात नेऊन तिच्या डोक्यात दगड घालून ठार केल्याचे सांगितले.

सर्वबाबी तपासात खात्री होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या महत्वपूर्ण घटनेच्या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल धुमसे, गणेश सोनवणे, हवालदार प्रकाश कासार, शितल गायकवाड, संतोष दोंदे, कृष्णा कोकाटे, लहू सानप, संदीप मथुरे, नितीन भालेराव यांचे विशेष योगदान लाभले.

Web Title: One Arrested for Women murder