ताडी लिलावातून सरकारला एक कोटी 31 लाखांची कमाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नाशिक - उत्पादन शुल्क विभागाला 23 पैकी 16 ताडीच्या दुकानांच्या लिलावातून तब्बल एक कोटी 31 लाख 79 हजार रुपयांचा महसूल मिळाला. त्यातील 25 टक्के रक्कम प्रत्यक्ष जमा झाली. उर्वरित सात ताडी दुकानांना पुरेसा भाव न आल्याने लिलाव तूर्तास स्थगित ठेवल्याची माहिती राज्य उत्पादन विभाचे अधीक्षक आर. जी. आवळे यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज अप्पर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील 23 ताडी दुकानांचे लिलाव झाले. 23 पैकी 16 दुकानांचेच लिलाव होऊ शकले. उर्वरित सात दुकानांना अपेक्षित रक्कम न मिळाल्यामुळे सिन्नर रावळगाव, झोडगे, यसगाव, सौंदाणे, जऊळके, चिंचखेड येथील लिलाव तात्पुरते स्थगित ठेवले. ज्या तालुक्‍यात किमान एक हजार परिपक्व ताडीची झाडे असतील त्याच तालुक्‍याला ताडी विक्रीचा परवाना असलेले दुकान दिले जाते. जिल्ह्यातील पेठ रोड, आनंदवली, बेळगाव ढगा, सिद्धपिंप्री, इगतपुरी, घोटी, मालेगाव भाग एक व दोन, वडेल, पांढरूण, करंजगव्हाण, वडनेर-खाकुर्डी, वणी, दिंडोरी, लखमापूर अशा 16 ठिकाणचे लिलाव झाले. 2009-10 पासून लिलाव व निविदा पद्धतीने परवाने देण्यात आले होते. त्यानंतर 2013-14 पर्यंत दर वर्षी परवाना शुल्कात सहा टक्के, तर 2015-16 साठी सर्वोच्च बोलीवर दहा टक्के वाढ करून परवाना शुल्क भरल्यास परवाने देण्याचा निर्णय झाला. परवान्यांची 31 ऑगस्टला मुदत संपल्यानतर परवाना नूतनीकरणासाठी मुदतवाढ दिली होती.

Web Title: One crore 31 lakh income for government from tadi