चाळीसगाव: अपघातात ऊसतोड कामगाराचा मृत्यू

दीपक कच्छवा
बुधवार, 16 मे 2018

या घटनेची माहिती कृष्णापुरी तांडा (ता.चाळीसगाव) येथे समजताच येथील गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी विरगाव येथे धाव घेतली. मृतदेह रूग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करण्यात आले.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : द्वारकाधीश सहकारी साखर कारखाण्यावर वायररोप देण्यासाठी गेलेल्या कृष्णापुरी तांडा (ता.चाळीसगाव)येथील ऊसतोड कामगारांचा सटाणा रस्त्यावरील विरगाव फाट्यावर दुचाकी व ट्रकच्या अपघातात तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

कृष्णापुरी तांडा (ता.चाळीसगाव)येथील तरूण किशोर मुलचंद जाधव (वय 36) हे दुचाकी क्रमांक (एम.एच.19.CC.8648) वरून द्वारकाधीश सहकारी कारण्यावर वायररोप घेवुन जात होते. त्यावेळी सटाणा गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या विरगाव फाट्यावर सटाणाकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक (टी.एन.52 एफ.6879) हिने दुचाकीला जोरदार धडक दिली.यात किशोर जाधव यांचा जागेवरच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती कृष्णापुरी तांडा (ता.चाळीसगाव) येथे समजताच येथील गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी विरगाव येथे धाव घेतली. मृतदेह रूग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करण्यात आले.आज रात्री साडेनऊ वाजता कृष्णापुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात केले. या अपघातात मृत्यू पावलेल्या किशोर जाधव हा एकुलता एक होता.त्यामुळे या परिवारातील घरचा कर्ता पुरुष गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: one dead in accident