गिरणा पुलाचा कठडा तोडून ट्रक पडला खाली; चालकाचा मृत्यू 

दीपक कच्छवा
शनिवार, 23 जून 2018

मेहुणबारे गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरणा पुलावरून ट्रक सत्तर फुट खाली कोसळला ट्रक चालकाचा जागीच मृत्यु झाला.रात्री एकला ह्या घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना मिळताच पोलिस कॉन्स्टेबल गोरक चकोर, शैलेश माळी हे रात्रीच घघटनास्थळी दाखल झाले.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव - धुळे मार्गावरील गिरणा पुलाच्या डाव्या बाजुचा कठडा तोडुन सत्तर फुट खाली ट्रक पडला. चालकाचा जागीच मृत्यू झाला तर क्लीनर जखमी असुन रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रात्री एकच्या सुमारास घडली. 

मेहुणबारे गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरणा पुलावरून ट्रक सत्तर फुट खाली कोसळला ट्रक चालकाचा जागीच मृत्यु झाला.रात्री एकला ह्या घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना मिळताच पोलिस कॉन्स्टेबल गोरक चकोर, शैलेश माळी हे रात्रीच घघटनास्थळी दाखल झाले. तेथील वाहतुक सुरळीत करून.आता सकाळी ट्रकखाली दबलेला चालकाचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम पोलिस करत होते.

Web Title: one dead in accident near chalisgaon