पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार!

भगवान जगदाळे
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

भरधाव पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज (ता.20) सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास रायपूर बारीच्या पायथ्याशी घडली. या दुर्दैवी अपघातात हाच्छी (ता.शिंदखेडा) येथील रतन दंगल ईशी (वय-48) हे जागीच ठार झाले.

निजामपूर (धुळे) : भरधाव पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज (ता.20) सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास रायपूर बारीच्या पायथ्याशी घडली. या दुर्दैवी अपघातात हाच्छी (ता.शिंदखेडा) येथील रतन दंगल ईशी (वय-48) हे जागीच ठार झाले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

रायपूर बारीच्या पायथ्याशी वळण रस्त्यावर विद्युत वितरण कंपनीच्या डीपीजवळ ही घटना घडली. कळंभिरकडून रायपूरकडे जाणाऱ्या MH-18, BQ-1026 क्रमांकाच्या स्प्लेण्डर प्लस दुचाकीस रायपूरकडून साक्रीकडे जाणाऱ्या MH-18, AA-3530 क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो कंपनीच्या पिकअपने समोरासमोर जोरदार धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच साक्री पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घटनेचा पंचनामा केला.

सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना महाराष्ट्रासाठी केंद्राकडून मोठा निर्णय

रावसाहेब उत्तम ईशी (कोळी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साक्री पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. पिकअप चालक मनोज रमेश महाजन (रा.दोंडाईचा) याची रात्री उशिरापर्यंत साक्री पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती. पोलीस निरीक्षक चव्हाणके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नागेश सोनवणे घटनेचा पुढील तपास करीत आहेत. साक्री ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे साक्री पोलिसांकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one died in pick up van Accident at Nijampur Dhule