चाळीसगाव - धुळे रस्त्यावर अपघातात तरूण ठार 

accident
accident

मेहुणबारे (धुळे) : चाळीसगाव - धुळे रस्त्यावर खडकसिम फाट्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स गाडीने ओव्हरटेक करताना समोरून येणार्‍या दुचाकीला उडविले यामध्ये खडकीसिम (ता.चाळीसगाव) येथील तरूण ठार झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल (ता. 25) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

खडकीसिम येथील भुषण भाऊसाहेब सोनवणे (वय 26) व मयुरेश पाटील (वय 16) हे दोघेही घरून दुचाकी (क्रमांक MH.19.BJ.0822) वरून डिझेल घेण्यासाठी जवळच असलेल्या शिवगर्जना पेट्रोलपंपावर जात होते. त्यावेळी चाळीसगाव - धुळे रस्त्यावर धुळयाकडे जाणाऱ्या मॅक्सने (क्रमांक MH.18 E.8667) तिच्यापुढे जात असलेल्या मालवाहू गाडीला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात भूषण व त्याच्या सोबत असलेला मयुरेश हे दोघेही रसत्याच्या कडेला खोल चारीत दुचाकीसह पडले.

अपघाताची बातमी गावात कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. भूषण सोनवणे यास  रूग्णालयात घेऊन जात असतानाच रस्त्यातच त्याचा मृत्यु झाला. त्याच्यासोबत असलेला मयुरेश गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत भूषण याची घराची परिस्थिती खुपच हलाखीची होती.भुषण हा ज्या पेट्रोलपंपावर डिझेल घेण्यासाठी जात होता तेथेच तो कामाला होता. या घटनेची मेहुणबारे पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यत नोंद करण्याचे काम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com