श्रीगोंद्यातील मालमोटार अपघातात एक ठार  

shrigondha
shrigondha

श्रीगोंदे (नगर) : शहरातील बाह्यवळण रस्त्यावर शनिवारी रात्री मालमोटार शाळेला कमानीला धडकल्याने चालक बाळासाहेब घोडके (वय ४५ रा. कान्हूरपठार ता.पारनेर) हे जागीच ठार झाले. अपघात झाल्यावर सुमारे अर्धा तास घोडके गाडीतच अडकून राहिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली.

बाह्यवळण रस्त्यालगत शारदा विद्या निकेतन शाळेची  कमान आहे. तेथे शाळा असल्याने गतिरोधक केले आहेत. मात्र ते नवीन वाहन चालकाच्या लक्षात येत नाहीत. त्यावर पांढरे पट्टे राहिलेले नाहीत. घोडके यांच्याही ते लक्षात न आल्याने त्यांचे नियंत्रण सुटले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. मालमोटार धडकल्याने लोखंडी कमान कोसळली. त्यावेळी गाडीत असणाऱ्या सहकाऱ्याने उडी टाकल्याने तो वाचला. हा अपघात जबरदस्त असल्याने वाहन चालक घोडके गाडीतच अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी नगरसेवक अख्तर शेख, धनराज कोथिंबीरे यांच्यासह काही तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र त्यात वेळ गेला. दवाखान्यात दाखल केल्यानंतर घोडके यांना मयत घोषित केले. श्रीगोंदे पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com