कारच्या धडकेत एक ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

मोटरसायकल क्र. एम. एच. 28 वाय 5928 ने भुसावळ येथे नातेवाइकांकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला फोर्ड कार क्र. एम. एच.19 सी. यु. 2512 ने जांभुळधाबा जवळील गिट्टी खदान जवळ जोरदार धडक दिली.

मलकापूर : भरधाव कारने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत घिर्णी येथील 35 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 12 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता मलकापूर जामनेर राज्य मार्गावर जांभुळधाबा नजीक घडली.

तालुक्यातील घिर्णी येथील ईश्वरसिंह रमेशसिंह बघेले (वय 35) हे आज सकाळी मोटरसायकल क्र. एम. एच. 28 वाय 5928 ने भुसावळ येथे नातेवाइकांकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला फोर्ड कार क्र. एम. एच.19 सी. यु. 2512 ने जांभुळधाबा जवळील गिट्टी खदान जवळ जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की ईश्वरसिंह बघेले हे 10 ते 15 फुट फेकल्या गेले व कारही तीन ते चार पलट्या खाऊन शेतात जाऊन पडली. या अपघातात ईश्वरसिंह बघेले यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: one killed in car accident